संगमनेरचा विकास डोळ्याची पारणे फेडणारा : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

नगर परिषदेच्या 200 कोटी विकास कामांचे उद्घाटन
संगमनेरचा विकास डोळ्याची पारणे फेडणारा :  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

संगमनेर । प्रतिनिधी Sangamner

काँग्रेस पक्ष (Congress party) सक्षमतेने नेतृत्व करताना गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण होईल याला प्रधान दिले आहे. आघाडी सरकार (mahavikas aaghadi) हे जनतेची काम करत आहेत. मात्र संगमनेरचा (sangamner) विकास हा डोळ्यांची पारणे फेडणारा आहे असे गौरवोद्गार शिक्षण मंत्री वर्षा (Education Minister Varsha Gaikwad) गायकवाड यांनी काढले .

संगमनेर नगर परिषदेच्या (nagar parishad) विविध विकास कामांचा शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) होते. व्यासपीठावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Minister of State for Home Affairs Satej Patil), आ. डॉ. सुधीर तांबे (mla sudhir tambe), नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे (State President of Youth Congress Satyajit Tambe), डॉ. संजय मालपाणी, उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, शरयू देशमुख, इंद्रजीत थोरात डॉ. जयश्री थोरात, मुख्याधिकारी राहुल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

गोरगरिबांच्या जीवनात सर्वांगीण आनंद निर्माण होण्यासाठी थोरात व तांबे कुटूबियांनी आपले जीवन खर्‍या अर्थाने समर्पित केले आहे. पक्षनिष्ठा, पक्ष नेतृत्वाबद्दद्दल प्रेम, जनतेचे प्रेम, काँग्रेस पक्षाचे राज्यात नेतृत्व सांभाळताना संयम आणि गोड वाणीतून त्यांनी पक्षाला व पक्षातील कार्यकर्त्यांना मोठी बळकटी दिली आहे. विविध खात्यांमध्ये अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर या तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम केले आणि राज्याला एक सुसंस्कृत नेतृत्व दिले आहे. संगमनेर शहर हे विकासाचे मॉडेल ठरले आहेत. स्मार्ट सिटी (smart city) म्हणणार्‍यांनी खरेतर संगमनेर येऊन पहावे असे आवाहन त्यांनी केले

संगमनेर तालुका (Sangamner taluka) हा सर्वात जास्त शेततळे असलेला राज्यातील तालुका ठरला आहे. शाश्वत विकासाचे समाजकारण करताना ना. थोरात यांनी सर्वांना बरोबर घेतले आहे. राज्यात अनेक ऐतिहासिक व दूरदृष्टीचे कामे करताना त्यांनी कधीही कामाचा गवगवा केला नसल्याचे पाटील म्हणाले. संगमनेर नगरपालिकेने मागील पाच वर्षात अत्यंत चांगले काम केले आहे.

यामध्ये सर्व नगरसेवक, अधिकारी या सर्वांचे एकत्रित काम आहे. संगमनेरच्या चारही बाजूने जाणारी रस्ते चौपदरीकरण व सुशोभित होणार असून त्यामुळे पुढील अनेक पिढ्यांच्या भवितव्याचे काम होणार आहे. यावेळी आ. तांबे, संजय मालपाणी, नगराध्यक्षा तांबे आदींची भाषणे झाली. यावेळी अ‍ॅड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, कपील पवार, शिवसेनेचे अमर कतारी, मीरा शेटे, सुनंदा जोर्वेकर प्रमिला अभंग आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपनगराध्यक्ष आरीफ देशमुख केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर आभार बाळासाहेब पवार यांनी मानले

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com