न. पं. स्वतंत्र लढवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर

शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे सूचक विधान
न. पं. स्वतंत्र लढवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

‘दिंडोरी नगरपंचायतीत (dindori nagarpanchayat) विरोधकांमुळे जनता शिवसेनेबरोबर (shiv sena) आली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून भविष्यात अनेक कामे दिंंडोरी (dindori) शहरात होणार आहे. दिंडोरी नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. त्या दिशेने नियोजन करुन स्वबळावर लढवण्याचा निर्णय दोन्ही माजी आमदार घेतील’, असे सुचक विधान शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले.

दिंडोरीतील विश्रामगृहावर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या मुलाखती शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी घेतल्या. त्यावेळी ते बोेलत होते. भाऊसाहेब चौधरी पुढे म्हणाले की, शिवसेनेची सत्ता असूनही करोनामुळे (corona) राज्यात अनेक ठिकाणी निधी (fund) देता आला नाही. यापुढील काळात दिंडोरी शहरात नगरविकासाचे कामे करण्यासाठी निधी दिला जाईल.

दिंडोरी शहरातील भ्रष्टाचार (Corruption) कारभाराबाबत लवकरच शिष्टमंडळाची भेट नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांच्याबरोबर करुन दिली जाईल. दिंडोरी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना कटीबध्द राहिल असे ते म्हणाले. दिंडोरी नगरपंचायतीत माजी आमदार रामदास चारोस्कर (former mla ramdar charoskar) यांची भुमिका महत्त्वाची आहे.

धनराज महाले व रामदास चारोस्कर हे दोघे मिळून शहरातील 17 जागा लढवण्याचा निर्णय घेतील. त्यानंतर वरिष्ठांकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे शिवसेनेचे कामकाज होईल. परंतू शिवसैनिकांच्या 17 जागा लढवण्याच्या मागणीला प्राधान्य राहिल, असेही चौधरी यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, नाना मोरे, कैलास पाटील, विठ्ठलराव अपसुंदे, वसंत थेटे, तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, जयराम डोखळे,

प्रभाकर जाधव, संतोष मुरकूटे, नारायण राजगुरु आदींच्या उपस्थितीत सहा गट व बारा गणातील विविध पदाधिकार्‍यांच्या मुलाखती झाल्या. लवकरच नियुक्त्या जाहीर केल्या जाणार आहे. सकाळी भाऊसाहेब चौधरी यांचे दिंडोरी शहरात आगमण होताच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतिश देशमुख, संदीप जाधव, दीपक जाधव, पोपट चौघुले, अरुण गायकवाड, किशोर कदम, राकेश शिंदे, सचिन देशमुख आदींनी फटाके वाजवून जोरदार स्वागत केले.

दिंडोरी समस्याबाबत लवकरच बैठक

दिंडोरी नगरपंचायतीच्या विविध प्रश्नांबाबत लवकरच मंत्रालयात (ministry) बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन भाऊसाहेब चौधरी यांनी दिले. दिंडोरी शहरातील भ्रष्ट कारभार, विविध समस्या, कामगारांचे प्रश्न आणि बोगस मतदार याद्या (voter lists) यावर शिवसैनिकांनी तक्रारी केल्या आहे. त्यांची दखल घेऊन कार्यवाही होण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल असे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले.

खा. संजय राऊत दिंडोरी दौर्‍यावर

दिंडोरी नगरपंचायत व तालुक्यातील निवडणूकांबघता कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरीता शिवसेनेचे उपनेते खा. संजय राऊत (mp sanjay raut) दिंडोरी दौर्‍यावर येणार असून या निमित्ताने दिंडोरी शहर भगवे करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिंडोरी नगरपंचायतीच्या आगामी निवडणूकीत (election) शिवसेनेला प्रचंड यश मिळण्याचा अंदाज वरिष्ठस्तरावर गेल्याने वरिष्ठ नेत्यांनी दिंडोरी शहरात व तालुक्यात लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दिंडोरी शहरासाठी मोठ्या निधींची घोषणा होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com