ओबीसी समाजाची फसवणूक; समता परिषदेकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा

ओबीसी समाजाची फसवणूक; समता परिषदेकडून राज्यभर आंदोलनाचा इशारा

सिन्नर। प्रतिनिधी | Sinnar

ओबीसी समाजाची (OBC community) माहिती संकलित करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आयोगाने प्रत्यक्ष पडताळणी न करता न्यायालयास खोटी माहिती (False information) दाखल करुन समाजाची फसवणूक (deception of society) केल्याची भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.

महात्मा फुले समता परिषदेने (Mahatma Phule Samata Parishad) तहसिलदार राहुल कोताडे (Tehsildar Rahul Kotade) यांना निवेदन (memorandum) देत समाजाची सत्य परिस्थिती न्यायालयासमोर ठेवण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन (agitation) करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशाने शासनाने ओबीसींची माहिती संकलीत करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. सदर आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डाटा (Imperial data) दारोदार जाऊन जमा करणे अपेक्षीत होते.

ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती त्या माध्यमातून समोर यावी अशीही त्यामागची भावना होती. मात्र, आयोगाने प्रत्यक्ष कुठेही न जाता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पध्दतीने माहिती संकलित केल्याचा आरोप होत आहे. ही ओबीसी समाजाची फसवणूक असून त्यातून कधीही भरुन न येणारे नुकसान होणार असल्याची भावाना व्यक्त होत आहे.

समर्पित आयोगाद्वारे चुकीच्या पध्दतीने होणारे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्यामार्फत योग्य ती माहिती संकलित करुन शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. असे न झाल्यास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी राजेंद्र जगझाप, संजय काकड, राजेंद्र भगत, सुभाष कुंभार, कैलास झगडे, डॉ. विष्णु अत्रे, बंडूनाना भाबड, डॉ. संदीप लोंढे, विशाल चव्हाण, लक्ष्मण बर्गे, संतोष पवार, संदीप भालेराव, विजय लव्हाटे, मनोज महात्मे, संजय लोणारे, विलास दराडे, भाऊसाहेब पवार, कैलास गोळेसर, आकाश विश्वकर्मा, राजेंद्र माळी, महिला आघाडीच्या मेघा दराडे, आफरीन सैय्यद यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com