धोकादायक वाड्याची भिंत कोसळली

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
धोकादायक वाड्याची भिंत कोसळली

जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला असून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ( Heavy Rain )जुने नाशिक भागातील डिंगरआळी येथील एका बंद वाड्याची भिंत कोसळली. वाडा बंद असल्यामुळे जीवित हानी झाली नाही. मात्र या भिंतीमुळे येथील मार्ग बंद पडला असून शेजारील घरांना धोका वाढला आहे. महापालिकेने नियोजन करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आंबाडकर आणि जोशी यांचा तो वाडा आहे, अशी माहिती मिळाली आहे. डिगरअळी परिसरात वाड्याची भिंत कोसळली. वाडा बंद असल्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या कर्मचान्यांनी घटनास्थळी पाहणी करून बचाव कार्य सुुरु केेले. प्रमोद नारायण जोशी व प्रदिप सिताराम आंबाडकर यांच्या तो वाडा होता मात्र मागील अनेक वर्षापासून तो बंद होता.महापालिका प्रशासनाने यापूर्वीच आंबाडकर आणि जोशी वाड्याला धोकादाय घोषित करून नोटीस देखील बजावली होती.

दरम्यान आतापर्यंत जुने नाशिक परिसरात वाडे किंवा त्यांचे भाग कोसळण्याचे घटना घडल्या आहे तर महापालिकेच्या वतीने सुमारे 15 ते 20 धोकादायक वाडे आतापर्यंत रिकामे करण्यात आले आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने यावर्षी धोकादायक वाड्यांना नोटिसा बजावले आहे तर त्यांना त्वरित धोकादायक इमारती खाली करण्याच्या सूचना देखील करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com