विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! ऑगस्टमध्ये होणार सीएस परीक्षा

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! ऑगस्टमध्ये होणार सीएस परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कंपनी सेक्रेटरीज (CS) या शिक्षणक्रमाच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक (Revised timetable) जाहीर केले आहे. त्यानुसार सीएस परीक्षा (CS exam) देशभरातील विविध केंद्रांमध्ये दि. १० ते २० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे...

सीएस अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन हे आयसीएसआयच्या माध्यमातून केले जाते. यंदा या परीक्षा दि. १ ते १० जूनदरम्यान होणार होत्या. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. आता कोरोनाची (Covid-19) लाट ओसरल्याने सीएपाठोपाठ (CA) सीएस अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सीए परीक्षा (CA Exam) जुलैमध्ये (July) सूरू झाल्यावर सीएसच्या परीक्षा ऑगस्टमध्ये (August) घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सीएस शिक्षणक्रमाशी निगडित फाऊंडेशन प्रोग्राम (Foundation program), तसेच एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (executive programs), प्रोफेशनल प्रोग्राम (professional programs) (जुना व नवीन अभ्यासक्रम) या परीक्षा होणार आहेत.

सीएस फाउंडेशन प्रोग्रामची परीक्षा दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी, तर एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल प्रोग्राम्ससाठी सीएस परीक्षा दि. १० ते २० ऑगस्टला होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com