दोन तडीपार सराईतांच्या आवळल्या मुसक्या

दोन तडीपार सराईतांच्या आवळल्या मुसक्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तडीपार (Tadipar) केलेल्या दोन सराईतांच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी (Nashik Police) आवळल्या आहेत. त्यात चुंचाळे (Chunchale) शिवारातील आणि भारतनगर (Bharat Nagar) परिसरातील सराईताचा समावेश आहे .

उद्धव अशोक राजगिरे (वय २०, चुंचाळे शिवार) या सराईतास पोलिसांनी वर्षभरासाठी हद्दपार (Deportation) केले होते. त्याच्या विरोधात अंबहड व इंदिरानगर पोलिस ठाण्यात मारामाऱ्या लुटमार, आर्म अॅक्टसह (Arm Act) पाच ते सहा गुन्हे आहेत. काल शनिवारी (ता २) सराईत पहाटे चारला त्याच्या घरी असल्याची माहीती मिळाल्यावरुन पोलिसांनी त्याला अटक केली .

शहर पोलिसांनी सराईताल ८ मार्चला शहर व जिल्ह्यातून एक वर्षापासाठी हद्दपार केले आहे. काल तो पूर्व परवानगीशिवाय चुंचाळेत सापडला. पोलिस नाईक राकेश राउत यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . दुसऱ्या घटनेत भारतनगर परिसरात फकिरा रमेश बढे ( वय २९) याला पोलिसांनी अटक केली आहे.

फकिरा बढे हा सराईत आहे. त्याच्या विरोधात सुमारे एक डझन गुन्हे आहेत. शुक्रवारी (ता.१) रात्री साडे आठला तो भारतनगर येथील मदरसा गल्लीत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली. दहा दिवसांपूर्वी म्हणजे २१ सप्टेंबरला त्याला पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. पोलिस हवालदार सागर जाधव यांच्या तक्रारीवरुन मुंबई नाका पोलिस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Related Stories

No stories found.