करोनामुक्तीचे प्रमाण ८४.१७ टक्के

राज्यात सर्वाधिक प्रमाण;नाशिककरांना दिलासा
करोनामुक्तीचे प्रमाण ८४.१७ टक्के

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका प्रशासनाकडुन शहरात करोनाचा संसर्ग रोकण्यासाठी वाढविण्यात आलेल्या अँटीजेन - करोना चाचण्या व मिशन झिरो अंतर्गत शहरात 20 मोबाईल डिस्पेन्सरी मार्फत सुरू झालेली आरोग्य तपासणी व अ‍ॅटीजेन चाचणी यांचे चांगले परिणाम दिसुन आले आहे.

यामुळेच आता दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.19 टक्क्यापर्यत गेले आहे. राज्यात नाशिकची ही टक्केवारी सर्वात जास्त आहे. या करोनासंसर्भातील स्थिती बदलल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात आता करोना संक्रमण अद्याप सुरूच असुन जुलै महिन्यात प्रति दिन सुमारे 200 च्या वर नवीन रुग्ण समोर आल्यानंतर ऑगस्ट महिन्यात सरासरी रुग्णांची संख्या 400 - 500 पर्यत गेली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडुन करोना चाचणी दररोज 200 - 300 आणि अँटीजेन चाचणी 1500 अशा एकुण 1500 ते 1700 चाचण्या केल्या जात आहे.

परिणामी रुग्णांचा आकडा वाढला असला तरी संसर्ग रोकण्यात महापालिकेला यश येत आहे. या चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधीत रुग्णांला तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. तर बाधीतांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या लोकांना बाजुला करण्यात येऊन प्रादुर्भाव रोकण्याचे काम केले जात आहे. परिणामी या नवीन बाधीत रुग्णांपासुन होणारा संसर्ग टाळण्यात महापालिकेला मोठे यश मिळत आहे.

महापालिकेकडुन कोविड रुग्णांवर आणि संशयित रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले जात असुन दाखल रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जुलै अखेर 60 टक्क्यावरुन 77 टक्कयापर्यत गेले आहे.

आता 18 ऑगस्टपर्यत महापालिका क्षेत्रातून 17420 रुग्णांपैकी 14666 रुग्ण बरे झाले आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.19 टक्के सतके झाले आहे. परिणामी शहरातील एकुण कोविड रुग्णापैकी केवळ 15 टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच तसेच रुग्ण ठणठणीत होण्याचे प्रमाण वाढले असल्याने यातून नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com