जिल्हा तलाठी संघाचे रविवारी होणार अधिवेशन

जिल्हा तलाठी संघाचे रविवारी होणार अधिवेशन
तलाठी (File Photo)

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

नाशिक जिल्हा तलाठी संघाचे (Nashik District Talathi Sangha) 34 वे पंचवार्षिक अधिवेशन (Five Year Convention) येत्या रविवारी (दि.18) दुपारी एक वाजता येथील हॉटेल पंचवटीच्या (Hotel Panchavati) सभागृहात होत असल्याची माहिती तलाठी संघाचे जिल्हा अध्यक्ष निळकंठ उगले (District President of Talathi Sangh Nilkanth Ugale), उपाध्यक्ष डी. बी. केसरे (Vice President D. B. Kesare), सरचिटणीस बाबासाहेब खेडकर (General Secretary Babasaheb Khedkar) यांनी दिली.

रविवारी (दि. 19) दुपारी एक वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game), जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन (Inauguration of the Convention) होईल.

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे (Maharashtra State Talathi Sangh) अध्यक्ष ज्ञानदेव डूबळ (President Dnyandev Dubal) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनास अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Upper Collector Dattaprasad Nade), मायादेवी पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे (Resident Deputy Collector Bhagwat Doiphode), उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे (Deputy Collector Bhimraj Darade), उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे (Sub-Divisional Officer Dr. Archana Plateau), पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे (Tehsildar Rahul Kotade),

महाराष्ट्र तलाठी संघाचे कार्याध्यक्ष एम. एल. पवार, उपाध्यक्ष म्हातारदेव सावंत, गौसमंहमद लांडगे, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, विभागीय अध्यक्ष अनिल भामरे, सरचिटणीस संतोष तनपुरे, संघटक सुभाष शिरसाट, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळत केवळ पन्नास टक्के तलाठ्यांना या अधिवेशनात प्रवेश देण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व पंधरा तालुक्यातील तलाठी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

तलाठी संघाची स्थापना सिन्नरमध्येच (sinnar) झाली असून 13-14 वर्षांपूर्वी राज्य तलाठी संघाचे अधिवेशनही सिन्नरला यशस्वीपणे पार पडले होते. जिल्हा तलाठी संघाचे अधिवेशन सिन्नरला पहिल्यांदाच होणार असून त्यानिमित्त महसूलचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी एकाच वेळी पहिल्यांदाच सिन्नरला येणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील तलाठ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढीचे चेअरमन संजय गाडे यांच्यासह तालुक्यातील सर्व तलाठी व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.

आम सभेत पदाधिकाऱ्यांची निवड

मूळ अधिवेशन रविवारी (दि. 19) होणार असले तरी त्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजता जिल्हा तलाठी संघाची ग्रामसभा हॉटेल पंचवटीच्या सभागृहात पार पडणार आहे. त्यात पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्ष व सरचिटणीस यांची निवड करण्यात येणार येईल. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सोमनाथ खैरे हे काम पाहणार आहेत. रविवारी (दि. 19) दुपारी 3:40 वाजता अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात उर्वरित कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com