समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान

समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

डॉक्टर (Doctor), वकिल (Lawyer), इंजीनिअर (Engineer), उद्योजक यासारखे दर्जेदार व्यक्तीमत्व शिक्षकांमुळेच निर्माण होत असल्याने आदर्श समाज घडविण्यात शिक्षकांचे (Teachers) योगदान मोठे राहिले आहे.

मात्र विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. शिक्षक संघटीत झाल्यास हे प्रश्न निश्चित मार्गी लागतील यासाठी आपण त्यांना पुर्णत: सहकार्य करू. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही म. गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक माजी आमदार डॉ. अपुर्व हिरे (Former MLA Dr. Unprecedented diamonds) यांनी येथे बोलतांना दिली.

जिल्हा मुख्याध्यापक संघ (District Headmasters Association) व मालेगाव तालुक्यातील (Malegaon) शहर, ग्रामीण व उर्दू शाळांचे सर्व मुख्याध्यापक व मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील केबीएच विद्यालयात (KBH Vidyalaya) आयोजित मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना डॉ. हिरे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून गुफरान अन्सारी, अध्यक्ष एस.के. सावंत, सचिव एस.बी. देशमुख, एस.बी. शिरसाठ, सुनील वडगे, टी.एम. डोंगरे, सुरेश शेलार, संस्थेचे संचालक ए. एस. पवार आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्य प्रविण पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करीत प्रास्ताविक केले.

जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार नियमित व वेळेत व्हावे, मेडिकल बिलासह सर्व फरकाची बिले, पी.एफ बिले व त्यासाठी बीडीएस त्वरित खुला करावा, वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव मार्गी लावावेत, अनुकंपा तत्त्वावरील मान्यता त्वरित मिळाव्यात, संचमान्यता दुरुस्त करून वाढीव पदे त्वरित मंजूर करावी, वेतनेतर अनुदान त्वरित द्यावे अशा विविध विषयावर चर्चा सहविचार सभेत करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

म. फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे यांनी मुख्याध्यापक संघाने शिक्षकांसाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. सचिव एस.बी. देशमुख यांनी संघाने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी गुफरान अन्सारी, एस.के. सावंत, जनार्दन आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीची निवड यावेळी केली गेली.

यामध्ये अध्यक्ष कमलाकर काकळीज, कार्याध्यक्ष सुनील फरस, सचिव नितीन हिरे, उपाध्यक्ष जे.एन. खैरनार, उपाध्यक्ष अन्सारी नईम शाईन, उपाध्यक्ष महिला के.व्ही. देसले, सहसचिव पिंजारी अनीस, विद्यासचिव शरद अहिरे, सहविद्यासचिव एम.पी. शिंदे, कोषाध्यक्ष प्रकाश पानपाटील, सहकोषाध्यक्ष आर.डी. शेवाळे, अंतर्गत हिशोब तपासणीस आर.के. शेवाळे, जिल्हा प्रतिनिधी प्रवीण पाटील, सुनील हिरे, एस.बी. काळे, कार्यकारणी सदस्य व्ही.जी. सोनवणे, फैयाज अहमद, एन.जे. निकम, युवराज पगार, शफिक सरदार, असिफ एकबाल, राशिद अख्तर, अब्दुल माजिद, जाहिद हुसेन यांची निवड करण्यात आली.

सभेस माणिक मढवई, अशोक कदम ,पुरुषोत्तम रकिबे, पी.एम. डोंगरे, के.डी.देवढे, वाय.आर. पवार, तुकाराम मांडवडे, दिनेश पवार, योगेश पाटील, आर.आर. मवाळ, किरण माऊली पगार, राजेंद्र महात्मे, शिवाजी रहाटळ, आर.आर. सातपुते, महेंद्र कुंवर, संजय देसले, राशिद पठाण यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे व शशिकांत पवार यांनी तर आभार राजेश धनवट यांनी मानले. सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक संजीव महाले, संजय शिंदे, नितीन गवळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.