बांधकाम व्यावसायिकाला कामगार महिलेने फसवले

तब्बल २० लाखांना गंडा
बांधकाम व्यावसायिकाला कामगार महिलेने फसवले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बांधकाम व्यावसायिकास (Builder) कर्मचारी महिलेने २० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कोविड काळात (Covid period) सदनिका विक्रीतून (Flats for sale) परस्पर रक्कम स्वीकारून हा अपहार करण्यात आला असून ग्राहकांना थेट ताबा ( Direct possession of customers) दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) फसवणुकीचा गुन्हा (crime of fraud) दाखल करण्यात आला असून संशयित महिलेस अटक करण्यात आली (woman was arrested) आहे. दिव्यानी मंगलचंद जैन (२८ रा . पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रसन्ना सायखेडकर (रा . त्र्यंबकरोड) यांनी तक्रार दाखल (File a complaint) केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सायखेडकर यांचे वडील सुभाष सायखेडकर हे बांधकाम व्यावसायिक असून विजय ललवाणी यांच्याशी त्यांची भागीदारी आहे. जय एन्टरप्रायझेस (Jay Enterprises) या फर्मच्या माध्यमातून साई रेसिडेन्सी (Sai Residency) नावाचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

ही सदनिका आणि गाळे विक्री करण्यासाठी संशयित दिव्यानी जैन यांची नेमणूक करण्यात आली असून सदर महिलेने नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ या कोविड काळात दहा ते बारा ग्राहकांचे येणारे पैसे कोटेशन प्रमाणे कंपनीला न भरता परस्पर रोख स्वरूपात स्वीकारून सुमारे २० लाखांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वाय. एस. माळी करीत आहेत.

Related Stories

No stories found.