झोपडपट्ट्यांसह नववसाहती जलमय

झोपडपट्ट्यांसह नववसाहती जलमय

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात काल सायंकाळनंतर वादळीवार्‍यासह (storms) जोरदार पर्जन्यवृष्टी (heavy rain) झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शहराच्या पुर्व भागातील झोपडपट्ट्यांसह (slums) पश्चिम भागातील कलेक्टरपट्ट्यासह नववसाहती (Neocolonial) जलमय झाल्या.

मोकळ्या भुखंडांना अक्षरश: तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. गटारी (Gutters) तुडूंब भरून रस्त्यावर वाहू लागल्याने नागरीकांचे दळणवळण विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प (Traffic jam) झाली तर पावसाला सुरवात होताच वीजपुरवठा खंडीत (Power outage) झाल्याने नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. शहर-परिसरात गत तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असतांना ग्रामीण भागात मात्र अपेक्षित पाऊस नसल्याने मृग नक्षत्र कोरडे जाण्याची चिंता शेतकरी (farmers) वर्गात व्यक्त केली जात होती.

काल सायंकाळनंतर मात्र तालुक्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाची हजेरी लागल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. शहर-परिसरात काल दिवसभर उनसावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक वीजांचा कडकडाट (Lightning strikes) व मेघगर्जनेसह वादळी पावसाला प्रारंभ झाला. मुसळधार पावसामुळे गटारी तुडूंब भरून रस्त्यावर वाहू लागल्याने बहुतांश रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांची त्रेधातिरपीट उडाली.

घरात शिरलेले पावसाचे पाणी बाहेर फेकत नागरीकांना रात्र जागून काढावी लागली. कलेक्टरपट्ट्यासह नववसाहती जलमय होवून रस्त्यांवर अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रात्री घर गाठतांना नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यातच पाऊस सुरू होताच वीजपुरवठा खंडीत (Power outage) झाला. रात्री उशीरा पाऊस थांबल्यानंतर बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, आघार, जळगाव गा. आदी भागात काल सायंकाळी 6 ते 8 दरम्यान वादळीवार्‍यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली. पिंपळगाव परिसरात पावसामुळे तब्बल बारा तास वीजपुरवठा खंडीत राहिल्याने नागरीकांचे हाल झाले. काष्टी, डाबली, अजंग, वडेल, वडनेर, खाकुर्डी, सावकारवाडी, झाडी, एरंडगाव, वर्‍हाणे, जळगाव निं., येसगाव, चंदनपुरी, ज्वार्डी, मळगाव, खायदे, गिलाणे, मथुरपाडे आदी भागातही वादळीवार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले असून खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकर्‍यांनी खते व बि-बियाणे खरेदीस प्रारंभ केला आहे. तालुक्यातील झोडगे, अस्ताने, राजमाने आदी माळमाथा भागात मात्र मृग पावसाने निराशा केली. सदर परिसरात काल सायंकाळी 15 ते 20 मिनीटे किरकोळ पावसाने हजेरी लावली असून या भागातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com