आमदार बनकरांच्या प्रयत्नाने रासाकाला पुर्नवैभव

आमदार बनकरांच्या प्रयत्नाने रासाकाला पुर्नवैभव

निफाड | Niphad | निफाड वार्तापत्र |आनंदा जाधव

गेल्या पाच वर्षापासून बंद असलेला रासाका आमदार दिलीप बनकरांच्या (mla dilip bankar) प्रयत्नाने जाणते राजे शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) यांचे हस्ते आज रविवारी गव्हाणीत मोळी टाकून सुरू होत असल्याने

यापूर्वी बाहेरील कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची (Sugarcane growers) होत असलेली लूट थांबणार असून शेतकरी (farmers), कामगार, व्यवसायिक, शेतमजूर यांचेसाठी आज खर्‍या अर्थाने ‘सोनियाचा दिन’ उगवला आहे. साहजिकच रासाकाला खर्‍या अर्थाने पुर्नवैभव प्राप्त झाले आहे.

साखर कारखानदारीच्या (Sugar factory) माध्यमातून तालुक्यात सहकार बहरावा अन् शेतकर्‍यांचा देखील विकास व्हावा यासाठी कर्मवीर काकासाहेब वाघ (Karmaveer Kakasaheb Wagh) यांनी तालुक्यात निसाका (Nisaka) आणि रासाकाची (Rasaka) उभारणी केली. परिणामी पहिली काही दशके हे कारखाने सुरळीत चालू राहिल्याने व तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढून दळण-वळण वाढले. तसेच शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली.

त्यानंतर मात्र हे कारखाने पुढार्‍यांसाठी चरावू कुरण बनले. साहजिकच त्याचा परिणाम कारखान्यावर कर्जाचा डोंगर वाढून ते बंद पडले. गेल्या दोन-तीन वर्षापासून हे कारखाने चालू करण्याची शेतकरी व कामगार मागणी करीत असतांनाही केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते चालू होवू शकले नाही किंवा चालू होवू दिले नाही.

त्यातच रासाका ज्यांनी भाडेतत्वावर चालविला त्यांनी तर रासाकाचे लचकेच तोडले. तसेच ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे देखील पैसे थकविले. तर तालुक्यातील कारखाने बंद असल्याने बाहेरील साखर कारखानदारांनी येथल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अक्षरश: लूटमार सुरू केली. ऊस तोडणीसाठी पैसे, वजनात कपात, पैसे देण्यास चालढकल करीत येथल्या शेतकर्‍यांना आपल्या बोटावर नाचविण्याचे काम केले.

मात्र आमदार दिलीप बनकर यांनी 24 जून 2021 रासाका भाडेतत्वावर घेण्याचा करार करून अवघ्या पाच महिन्यात कारखाना चालू करण्याचा भिम पराक्रम करून दाखविला. बनकरांनी 15 वर्षाच्या केलेल्या भाडेपट्टा करारात दरवर्षी कारखान्याला 2 कोटी भाडे व प्रतिटन 114 रुपये भाडे देण्याचा करार केला आहे. हा करार करतांनाच आमदार बनकरांनी रासाकाला पुर्नवैभव प्राप्त करून दिले.

कारखान्याचे पत्रे बदलले, शेततळ्याची निर्मिती, रस्ते, मशिनरी दुरूस्ती, रंगरंगोटी याबरोबरच नादुरूस्त मशिनरी बदलून नव्याने मशिनरी बसविली. सर्व सोयीसुविधांनी कार्यालय बनविली. तर आजपासून सुरू होणार्‍या ऊस गाळपासाठी या हंगामात 3 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ ठेवत दररोज 2000 टन ऊस गाळप करण्याचे नियोजन केले आहे.

याबरोबरच इथेनॉल व बायोगॅस प्रकल्पाचे काम देखील अंतिम टप्प्यात आणले आहे. रासाका परिसराला जोडणारे रस्ते याबरोबरच कर्मवीर काकासाहेब वाघ पुतळा परिसराचे सुशोभिकरण. तसेच विज, पाणी, रस्ते आदींची व्यवस्था करून पूर्वी पेक्षा कारखान्याचे रूपडे खुलविण्यात यश मिळविले. स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून रासाकाचे धुराडे पेटल्याने तालुक्यात खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे.

‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ याची आठवण होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत जनतेला आश्वासन दिले होते तुम्ही दिलीप बनकरांना आमदार करा कारखाना कसा चालू करायचा हे मी बघतो आणि रासाका सुरू करून अजित पवारांनी आपला शब्द खरा करून दाखविला. तर रासाकात आजपासून ऊसाचे गाळप होत असल्याने सोशल मीडियातून आ. बनकरांवर कौतुकाचा वर्षाव होवू लागला आहे.

मात्र येथेही काहींना राजकारण आठवू लागले आहे. मात्र मागील दिवस आठवले व शेतकर्‍यांना आलेल्या अडचणींचा विचार करता कारखाना चालू होणे कसे गरजेचे आहे व त्याचे दु:ख शेतकर्‍यांनी अनुभवले आहे. बनकरांनी रासाका चालू करून आपले कर्तव्य निभावले आहे. आत्ता शेतकर्‍यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला देवून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे.

जाणते राजे शरदचंद्रजी पवार, जिल्ह्याचे हेवीवेट नेते छगनरावजी भुजबळ यांचेसह मंत्रीगण लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांच्या उपस्थितीत रासाकाचा गाळप हंगाम सुरू होवून सहकाराला ऊर्जितावस्था प्राप्त होत असल्याने शेतकर्‍यांसाठी खर्‍या अर्थाने आज सोनियाचा दिवस उगवला असून आजच्या रासाका गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com