मिशन झिरो नाशिक
मिशन झिरो नाशिक
नाशिक

'मिशन झिरो' अंतर्गत शहरात तपासणी सुरू

उपक्रमाचे कौतुक

Gokul Pawar

Gokul Pawar

जुने नाशिक | Old Nashik

नाशिक महापालिका तसेच विविध सामाजिक संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या 'मिशन झीरो' अंतर्गत आज शहरातील विविध भागात नागरिकांची आरोग्य तपासणी करून नमुने घेण्यात आलेे तसेच काही वेळतच अहवाल देखील देण्यात आल्याने नागरिकांमध्य समाधानाचे वातावरण आहे.

जुने नाशिक, पंचवटी वडाळागाव आदी भागात कडा भागात व्हॅन पोहोचली होती. याठिकाणी लहान मुलांचा ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांची देखील आरोग्य तपासणी करून योग्य ते उपचार करण्यात येत आहे. करोना ला हद्दपार करण्यासाठी या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जुने नाशिक मध्ये मधील महापालिकेच्या डॉ. सुमंत नाईक उर्दू शाळेत झालेल्या शिबिरात कथाडा, भोई गल्ली, शिवाजी चौक, बागवानपुरा, द्वारका, आझाद चौक आदी भागातील नागरिकांनी लाभ घेतला. सकाळी महापालिकेची महापालिकेची व्हॅन या ठिकाणी दाखल झाली, तसेच त्यांनी पूर्ण सेटअप करून एका ठिकाणी तपासणी करून दुसऱ्या ठिकाणी सॅम्पल घेण्याची सोय केली होती. नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करून काही वेळातच अहवाल देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

विशेष करून लहान मुलांची देखील आरोग्यतपासणी करण्यात आल्याने पालकांमध्ये आनंद पसरला आहे. कारण लहान मुले खेळण्यासाठी बाहेर पडतात. त्याच प्रमाणे आज वडाळागांव येथील म्हाडा वसाहत, महेबुबनगर व परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी नागरिकांचे तापमान व ऑक्सिजनची पातळी तपासणी होत आहे.

तेथेच अँटीजेन किटद्वारे चाचणी करून गरजेनुसार औषध उपचार करून घरात विलीनीकरण राहण्याबाबत समुपदेशन करणे किंवा गरज वाटल्यास त्वरित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याबाबत प्रक्रिया होत आहे. यावेळी भाजपा द्वारका मंडल अध्यक्ष सुनील देसाई, नगरसेवक तथा भाजपा शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजिकय साने, नगरसेवक चंद्रकात खोडे, श्याम बडोदे, नगरसेविका सुप्रिया खोडे, सचिन कुलकर्णी, रफिक शेख तसेच डॉ.किरण सोनवणे, लॅब टेक्निशियन सागर खंबाईत आदी उपस्थित होते.

पंचवटीत तपासणी

अमृतधाम परिसरात करोना रुग्ण मिळाले होते. म्हणून या भागांत आजपासून मिशन झिरो हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम पुढील अवशकते नुसार सुरू राहणार आहे. यात ज्यांना करोना लक्षणांचा संशय असेल यांनी या उपक्रमात जाऊन आपली स्वब टेस्टिंग करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

या रॅपिड टेस्टमुळे अहवाल देखील लवकर प्राप्त होत आहे यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या वतीने लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. डॉ. विजय घुगे, मनपा औषध निर्माण अधिकारी बाजीराव सोनवणे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रत्नाकर गायकवाड, नगरसेवक सुरेश खेताडे, अमोल जगळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com