मनपा अतिरिक्त आयुक्तपदावर आता मुख्य लेखापरीक्षक अपात्र

मनपा अतिरिक्त आयुक्तपदावर आता मुख्य लेखापरीक्षक अपात्र

नाशिक । प्रतिनिधी

महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर महापालिकेतील अधिकार्‍यांमधून निवडीने नियुक्ती करतांना महापालिकेच्या तांत्रिक व लेखा सेवेतील समकक्ष अधिकार्‍यांचा समावेश करावा या तरतुदीतून मुख्यलेखा परिक्षक अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंदर्भातील निर्णय नगरविकास विभागाने नुकताच घेतला आहे.

राज्य शासनाने 9 एप्रिल 2021 रोजी हा निर्णय घेतला असून यात महानगरपालिकेतील अतिरीक्त आयुक्तांची पदे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांतून भरण्याबाबतच्या तरतुदीसंदर्भात स्पष्टीकरणासंदर्भात निर्णय घेतला आहे.महापालिकांच्या वर्गीकरणानुसार अतिरीक्त आयुक्तांचे पदे निश्चित करणे व अतिरीक्त पदे भरण्याची कार्यपद्दती निश्चित करण्यात आली आहे.

या निर्णयानुसार राज्यातील अ, ब व क वर्गाच्या महापालिकांतील अतिरिक्त आयुक्त पदाची जी पदे महापालिकेच्या अधिकार्‍यांतून भरण्यासाठी अनुज्ञेय व उपलब्ध अशा पदावर निवडीने नियुक्तीची कार्यपद्धती देखील विहीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांच्या तरतुदीच्या अनुषंगाने या शासन निर्णयातील काही तरतुदीसंदर्भात स्पष्टीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. यानुसार काही बदल करीत शासनाने निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 47 (2) मधील तरतुद विचारात घेता महापालिका अधिकार्‍यांतून अतिरीक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठी मुख्यलेखापरिक्षक पात्र असणार नाही. या पदावर महापालिका अधिकार्‍यांतून निवडीने नियुक्ती करतांना महापालिकेच्या सेवेत उपायुक्त किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या वैधानिक समकक्ष पदावर या पदांंना अधिनियमातील कलम 45 अनुसार शासनाची मान्यता प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून निवड सुचीच्या वर्षाच्या 1 जानेवारी रोजी किमान 10 वर्ष सेवा पुर्ण होणे आवश्यक अशी तरतूद आहे.

तथापी यामधील मुख्यलेखा परिक्षक वगळता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 45 नुसार शासनाच्या मान्यतेने महापालिकेने निर्माण केलेल्या पदावरील सुयोग्य अधिकारी हे विभाग प्रमुख असणे अभिप्रेत आहे, असे स्पष्टीकरण या निर्णयात करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com