विद्यार्थ्यांच्या क्षमता भरून काढण्याचे आव्हान

विद्यार्थ्यांच्या क्षमता भरून काढण्याचे आव्हान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मला दोन मुले आहेत. ती यंदा दहावीत आहेत. त्यांच्या अभ्यासासाठी तर शाळा School सुरू व्हायलाच पाहिजेत. पण शाळा म्हणजे फक्त अभ्यास आहे का? शाळेमुळे मुलांच्या अनेक क्षमता आणि जाणिवा विकसित होतात School develops many abilities and perceptions of children. शिस्त पाळणे, शांतपणे बसून ऐकून घेणे, आत्मविश्वासाने समोरच्या व्यक्तीकडे बघत आपले म्हणणे मांडणे, मोठ्यांविषयी आदराची भावना जोपासणे, घरून आणलेला डबा खाणे, डब्यातील पदार्थ एकमेकांना वाटणे, शाळा सकाळची असेल तर लवकर उठणे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. लिहिणे, बोलणे, वाचणे, ऐकणे आणि जे ऐकले त्यावर मनन करणे अशा जाणिवा विकसित व्हायला शाळेतच मदत होते.

या सगळ्या गोष्टी पालक म्हणून आम्ही मिस करत होतो. घरी पण मुलांवर संस्कार करता येतात. पण सामूहिकरीत्या ते उत्तम होतात आणि शाळेतील सगळ्याच गोष्टी घरी कशा होतील. त्यामुळे बरे झाले शाळा सुरू झाल्या. करोनाची बंधने पाळून मुले शाळेत जाऊ लागली आहेत. याचाच आनंद आहे.

निता सांगलीकर, नाशिक

दीड वर्षांच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरू होत आहेत. याचा खूप आनंद होत आहे. खूप दिवसांनी मला माझे मित्र भेटले. आम्ही एकमेकांशी फक्त फोनवर बोलत होतो. व्हिडियो कॉलदेखील करत होतो. पण प्रत्यक्ष भेटीची मजाच वेगळी. आता शाळेत मोकळा श्वास घेता येईल. अर्थात आठवड्यातून तीनच दिवस वर्ग घेणे, खेळांना मनाई करणे यामुळे आनंंदावर काहीसे विरजण पडले आहे असे वाटते. कारण आमच्यासाठी शाळा म्हणजे अभ्यास आणि मोकळ्या वेळेत दंगामस्ती. म्हणजे अभ्यास करता येईल पण दंगामस्ती कशी करणार? त्यामुळे आता आठवडाभर शाळा सुरू ठेवावी. तसेच खेळांना परवानगी द्यावी असेच मला वाटते.

अथर्व भांड, इयत्ता 9 वी, भोसला मिलिटरी स्कूल

मुलांना शिक्षणाशी मानसिकदृष्ट्या जोडणे हे आव्हान आहे. याकाळात मुले पाठ्यपुस्तकांपासून तुटली असून दूरदर्शनशी, मोबाईलशी त्यांचे नाते जोडले गेले आहे. त्यांना पुन्हा पाठ्यपुस्तकाशी जोडणे महत्त्वाचे ठरणार आहे. मधल्या कालावधीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला शंभर टक्के यश आले असे म्हणता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन आता त्यांचा बुडालेला पाठ्यक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुक्ता शिंदे, शिक्षिका, जिल्हा परिषद

ऑनलाईन शिक्षणाला खूप मोठ्या प्रमाणावर मर्यादा आहेत. विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नसणे, नेटवर्क उपलब्ध नसणे, त्याचबरोबर मोबाइल स्क्रीन वापरण्यात आरोग्याच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी, विद्यार्थ्यांच्या आकलनाला येणार्‍या मर्यादा या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.

मैदानाशी असणारे नाते तुटले आहे. त्यामुळे सामाजिक जीवनात अंतर पडले आहे. प्राथमिक स्तरावरती विद्यार्थी मूलभूत स्वरुपाचे कौशल्य प्राप्त करत असतो. भाषेची कौशल्ये, गणिताची कौशल्ये प्राप्त झाली नाही तर पुढील शिक्षण कठीण होते. मात्र आता विद्यार्थी सलग दोन वर्षे पाठ्यक्रमाने पुढच्या वर्गात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या क्षमता भरून काढण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे. या कालावधीत मोबाईलचा वापर वाढला असल्याने त्यांच्या शारीरिक आरोग्यावरदेखील परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोबाईलपासून तोडणे, हेही महत्त्वाचे आहे.

बाळासाहेब वाकचौरे, मुख्याध्यापक

Related Stories

No stories found.