केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवावी

येवला शिवसेनेचे निवेदन
केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवावी

येवला l Yeola (प्रतिनिधी)

कोरोनाच्या संकट काळात आधीच शेतकरी संकटात सापडला असतांना केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी ने शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत नव्याने भर पडत आहे. कोरोना काळात शेतकर्यांनी अतिशय मेहनतीने उत्पादन घेतले, मागील वेळेसे ५०० ते ६०० इतका कमी भावात कांदा विकला जात होता.

त्यात उत्पादन खर्चही निघत नव्हता आज दोन पैसे शेतकर्यांच्या हाताला मिळण्याची वेळ येताच केंद्राने निर्यात बंदी लादली ही बाब शेतकर्यांचा कणा मोडण्यासारखीच आहे महागडे बियाने शेतकर्यांना घ्यावी लागलीत, रात्रंदिवस शेतात राबराब राबावे लागले आणि सर्व काही करुन शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास केंद्राने लादलेली निर्यात बंदी मुळे दुरवाणार आहे. हि बाब निषेधार्त आहे.

केंद्र सरकारने गोरगरीब शेतकर्यांच्या भावना समजुन घ्याव्यात व त्वरीत कांद्यावर लादलेली निर्यात बंदी उठवावी व शेतकर्यांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र अंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना येवला तालुक्याच्या वतीने येवला तहसिलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी तहसिलदार रोहीदासजी वारुळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना नेते संभाजीराजे पवार, तालुका प्रमुख रतन बोरणारे, युवा सेना राज्य विस्तारक कुणालशेठ दराडे, येवला पंचायत समितीचे सभापती प्रविण उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, चंद्रकांत शिंदे, उपसभापती मंगशे जाधव, विठ्ठलराव आठशेरे, मा जि. प. सदस्य बाळासाहेब पिंपरकर, साहेबराव बोराडे दशरथ देवकर, शरद आबा लहरे, बापु गायकवाड, प्रशांत जाधव व असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com