महापालिकेच्या अहवालानंतरच गुन्हा

भिंत कोसळल्याप्रकरणी पोलिसांची भूमिका
महापालिकेच्या अहवालानंतरच गुन्हा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

रविवार पेठेतील (Ravivar Peth) घनकर गल्ली (Ghankar Lane) येथील वैश्य वाड्याची (Vaishya Wada) मागील भिंत कोसळून दोन महिला गंभीर जखमी झाल्याच्या घटनेप्रकरणी महानगर पालिकेच्या नगररचना विभागाचा (Municipal Corporation's Town Planning Department) अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी भूमिका पोलीस (Police) प्रशासनाने घेतली आहे...

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वैश्य वाड्याची मागील भिंत कोसळून संगीता अजित वैश्य (55) (Sangeeta Ajit Vaishya) आणि रिटा वैश्य (27) (Rita Vaishya) या दोन महिला जखमी झाल्या होत्या. वैश्य वाड्यामागील जागेतील जोशी वाडा (Joshi Wada) पाडून या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम सुरू होते.

खोदकाम सुरू असतानाच साडेसहा वाजेच्या सुमारास वैश्य वाड्याची मागील संपुर्ण भिंत कोसळली. या भिंतीसोबत वाड्यातील दुसर्‍या मजल्यावर असणार्‍या दोन महिला खाली खड्ड्यात कोसळल्या. रिटा वैश्य या माती विटांच्या ढिघार्‍यात अडकल्या होत्या.

कुटुंबीय तसेच स्थानिक नागरीकांनी धाव घेत त्यांना ढिगार्‍यातून बाहेर काढून तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलवले. याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाकडून पाहणी सुरू होती.

दरम्यान, जोशी वाड्यासाठी खोदलेल्या जमिनीमुळे वैश्य वाडा धोक्यात आला. या कामामुळेच वाडा कोसळल्याचा असून जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वैश्य कुटुंबातील सदस्य विनोद खेमचंद वैश्य (Vinod Khemchand Vaishya) यांनी केली आहे.

त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. परंतु नगररचना विभागाचा अहवाल आल्यानंतर त्यातील निष्कर्षाणनुसार गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे सरकारवाडा पोलीसांनी (Sarkarwada Police) स्पष्ट केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com