कॅन्टोन्मेंटची वाटचाल ‘पेपरलेस’कडे
नाशिक

कॅन्टोन्मेंटची वाटचाल ‘पेपरलेस’कडे

डिजिटल इंडियाला करणार सहकार्य

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

करोना विषाणू संसर्ग फैलावामुळे नागरिकांना यावर्षी कागदावर छपाई केलेले टॅक्स किंवा पाणी बिल दिले जाणार नसून नागरिकांनी बिले ऑनलाइन पद्धतीने शोधून भरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करताना यापुढे जास्तीतजास्त कामकाज हे पेपरलेस करण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. याकरिता नागरिकांना cbdeolali.org या वेबसाइटला भेट देता येईल.

यावर्षी नागरिकांना टॅक्स व नॉन टॅक्स बिल वेगवेगळे करण्यात आले आहे. यासाठी कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील रहिवाशांचा ग्राहक आयडी तयार करण्यात आला आहे. नॉन टॅक्स विभागात सूचना शुल्क, कचरा शुल्क व व्याजाचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने भरणा करताना टॅक्स, नॉन टॅक्स असा स्वतंत्र उल्लेख असलेल्या रकान्याला भेट देणे आवश्यक आहे. त्यासोबतच कचरा शुल्क हे 200 रुपयांवरून चारशे रुपये प्रतिवर्ष करण्यात आले आहे.

याशिवाय व्यावसायिक स्तरावरील कचरा करामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. याकरिता सर्व नागरिकांनी आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, हा कॅन्टोमेंट प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे नोंदविणे गरजेचे आहे. या माध्यमातून नागरिकांना घरपट्टी व पाणी पट्टी ऑनलाइन पद्धतीनेच मिळणार आहे. याबाबत नागरिक कॅन्टोन्मेंट कार्यालयात अधिक माहिती घेऊ शकतील.

नागरिकांना बिले भरण्यासाठी cbdeolali.org. online services property tax/ water charge या संकेतस्थळाला भेट देता येईल.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने बदलत्या काळानुसार प्रशासकीय कामकाजची पद्धत राबवताना वेळ व पैसे याबाबत सतर्कता बाळगण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासकीय अधिकारी उमेश गोरवाडकर यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण देशात डिजिटलचा प्रयोग सुरू केला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंटचा कारभार देखील पेपरलेस करून या उपक्रमात सहभागी होत असल्याने नागरिकांनीही सहकार्य करावे.

अजय कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com