मनपा मुख्यालयात कॅन्टीन सुरू होणार

मनपा मुख्यालयात कॅन्टीन सुरू होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेतील सेवक ( NMC Employees )चहा पिण्याच्या नावाखाली तासन्तास हातातील काम सोडून बाहेर जातात. अशा सेवकांची तलफ भागवण्यासाठी मनपा मुख्यालयातील कॅन्टीन ( Canteen )सुरू करण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला आहे. राजीव गांधी भवनमधील ( Rajiv Gandhi Bhavan ) कॅन्टीन रॉयल्टी तत्त्वावर लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

मनपाचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमधील काही कर्मचारी हातातील काम सोडून बाहेर चहा पिण्यासाठी जातात. ते कर्मचारी तासन्तास पुन्हा येत नाहीत. अशा बाहेर जाणार्‍या कर्मचार्‍यांचा शोध सुरू असताना मनपा प्रशासक तथा आयुक्त रमेश पवार ( NMC Commissioner Ramesh Pawar )यांना एक गोष्ट निदर्शनास आली. राजीव गांधी भवनमधील कॅन्टीन बंद असल्यामुळे अनेक कर्मचारी चहा पिण्याच्या नावाखाली आपले काम सोडून तासन्तास बाहेर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यावर ठोस पर्याय म्हणून मुख्यालयातील बंद पडलेली कॅन्टीन सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. यासंदर्भात लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. नागरिकांच्या कामांना कुठल्याही प्रकारे विलंब होता कामा नये म्हणून कॅन्टीन सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून बीओटी तत्त्वावर तसेच रॉयल्टी बेसवर सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी मनपा कॅन्टीन समिती गठित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू असून लवकरच याबाबत निविदा काढण्यात येणार आहे. हे काम जाहिरात परवाना विभागाने करायचे असून या विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य लेखापरीक्षक, लेखाधिकारी, अतिरिक्त आयुक्त यासह दोन उपयुक्त यांची समिती गठित करण्यात येणार असून समिती यावर लवकरच अहवाल देणार आहे. आयुक्तांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर बंद पडलेली कॅन्टीन सुरू करण्यात येणार आहे. यामुळे तासन्तास चहाच्या नावाखाली बाहेर भटकणार्‍या कर्मचार्‍यांना पायबंद बसणार असून कामकाजाचा वेग वाढणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com