
सातपूर | Satpur
शहर परिसरात वाढत चाललेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर संक्रमण थांबविण्यासाठी बाजारातील गर्दी कमी करण्याचे निर्णय घेतले. यासाठी सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते.
मध्यंतरी व्यवसायिकांनी शासनाला विनंती करून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सलग दुकाने सुरू ठेवण्याची विनंती केली होती. काही काळ शासनाच्या वतीने यावर काम करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गर्दीत उतार पडत नसल्याने शासनाने पुन्हा एकदा नियम कसोशीने पाळण्यात सुरुवात केली आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मिष्ठान्न दुकानांना सलग सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी या व्यावसायिकांद्वारे करण्यात येत आहे.मात्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व्यवसायिकांनी ऑड-ईव्हन चा नियम पाळावा अशी कणखर भूमिका मनपा प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे दररोज पोलीस कर्मचाऱ्यांच्या सह मनपा कर्मचारी सम-विषमच़्या पालनासाठी व्यवसायिकांना दमटावताना दिसून येत आहे.
दुसऱ्या बाजूला व्यवसायिक यांची वेगळी नाराजी आहे रस्त्याच्या एका बाजूला दुकाने असून दुसऱ्या बाजूला ओसाड जागा आहे अशा भागातही सम-विषम कोणासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ज्या भागात समोरच्या बाजूने दुकानात नाहीत त्यांना सगळे उघडे ठेवण्यास परवानगी मिळावी अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे