जुने नाशिक । प्रतिनिधी

मागील सुमारे 400 वर्षापासून नाशिक शहर परिसरातील हजारो भाविक शाहजानी ईदगाह मैदानावर ईदच्या वेळी नमाज पठण करण्यासाठी गोळा होतात. त्या ठिकाणी मनपाकडून बस टर्मिनल तयार करण्यात येत आहे. त्या ऐवजी इतर ठिकाणी टर्मिनल तयार करावे, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांना आज निवेदन देऊन करण्यात आली.

ईदगाह मैदानालगत होणार्या बस टर्मिनलच्या प्रस्तावाला मुस्लिम समाजाकडून विरोध होत आहे. तर मनपाचे त्वरीत प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पुर्वीच करण्यात आली आहेत.

खतीब-ए-नाशिक हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाच्या शिष्टमंळाने ना.भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देण्यात आले.

टर्मिनल मनपाच्या शेडच्या जागी किंवा गंजमाळ येथेही तयार होऊ शक्तो, अशी माहिती देण्यात आली. शाहजानी ईदगाह मैदानाची जागा शासन वक्फ ट्रस्ट नोंदणीकृत आहे. या जागेच्या सातबारा उतार्यावर देखील मुस्लीम समाजाचे नाव आहे.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका समीना मेमन, माजी नगरसेवक हाजी निजाम कोकणी, सिराज कोकणी, गुलजार कोकणी, हाजी सलिम मिर्झा, एजाज रजा, हाजी जाकीर, आदी उपस्थित होते.