घाटात बस कोसळली; 2 ठार; 40 जखमी

जखमींमध्ये बागलाण तालुक्यातील मजुरांचा समावेश
घाटात बस कोसळली; 2 ठार; 40 जखमी

सटाणा । प्रतिनिधी | Satana

पिंपळनेर-सुरत रस्त्यावरील (Pimpalner-Surat Road) अवघड वळण असलेल्या चरणमाळ घाटात बागलाण तालुक्यातील (baglan taluka) मजुरांना घेऊन जाणारी लक्झरी बस (luxury bus) दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात (accident) दोन जण ठार व 40 जण जखमी झाले. मृतांमध्ये बस चालकासह एका अठरा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे.

अपघातातील जखमींपैकी बहुतांशी प्रवासी मजूर हे बागलाण तालुक्यातील (baglan taluka) असल्याचे निदर्शनास आले आहे. अपघातातील गंभीर जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात (Government hospital) दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींना वैद्यकीय उपचार (Medical treatment) करून सोडून देण्यात आले आहे. या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की रविवारी रात्री 50 पेक्षा जास्त मजूर घेऊन लक्झरी बस (bus) पिंपळनेर मार्गे सुरत (surat) कडे जात होती.

या मार्गावरील अतिशय अवघड वळण असलेल्या चरणमाळ घाटात बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने बस खोल दरीत कोसळून अपघात (accident) झाला. त्यात बस चालकासह 18 महिन्याच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 40 जण जखमी झाले आहेत. यापैकी 18 जन गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये पूर्वा जगताप, अनिता गवळी, संगीता माळी, सुरेखा वाघ, राजीव खैरनार, महेंद्र दादाभाई वाघ्या, पवार, वैशाली गवळी, शितल जगताप, राणी बोरसे, दीपक मोरे, कैलास पवार,

सुरेखा माळी, वैशाली सोनवणे, राजीव सोनवणे, श्रावण गवांडे, कृष्णा सोनवणे, राजन सोनवणे, पुनम सोनवणे, सुरेखा माळी, विमल पवार, कस्तुराबाई सोनवणे, विशाल पवार, शुभम जगताप, संगीता जगताप, राणी बोरसे, अश्विनी माळी, पुनम सोनवणे आदींचा समावेश आहे. अपघातातील बहुतांशी मजूर हे बागलाण तालुक्यातील सटाणा, ताहाराबाद, डांगसौंदाणे, अजमीरसौंदाणे, दसाने, तरसाळी, करंजाड, सोमपूर, केरसाने गावातील आहेत.

दरम्यान बागलाण तालुक्यातील आदिवासी (tribal) भिल्ल समाजातील बहुतांशी मजुरांना घेऊन काही ठेकेदार त्यांना ऊसतोड कामासाठी तसेच गुळ बनविण्याच्या कामासाठी दरवर्षी जुनागड (Junagadh), सुरत (surat), कोडीनार परिसरात घेऊन जात असतात. यापूर्वीही अशाच प्रकारचे अपघात (accident) होऊन त्यात काही आदिवासी मृत्युमुखी पडले आहेत तर काहीजण ऊसतोड काम करतानाच मयत झालेले आहेत.

अपघात ग्रस्त आदिवासी मजुरांना घेऊन जाणार्‍या ठेकेदारांकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई (compensation for damages) दिल्याचे अद्याप पर्यंत दिसून आलेले नसून निदान यापुढे तरी परप्रांतात कामासाठी जाणार्‍या आदिवासी मजुरांना पुरेसा रोजगार मिळण्याबरोबरच नुकसान भरपाई देण्याबाबत आदिवासी नेत्यांनी शासन दरबारी आवाज उठवावा अशी मागणी आदिवासी समाजातील मजुरांनी व्यक्त केली आहे.

ताहाराबाद - अंतापूर गावाजवळून जाणार्‍या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून वाहनधारक व दावल मलिक बाबांच्या मंदिरात येणार्‍या हजारो भाविकांची मोठी अडचण होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com