अंबड परिसरात 'द बर्निंग ट्रक'चा थरार

अंबड परिसरात 'द बर्निंग ट्रक'चा थरार

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

अंबड औद्योगिक वसाहतीकडून (Ambad MIDC) लियर कंपनीकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एम एच ०४ डी एस. ८०३८) च्या केबिनला वायरिंग मध्ये बिघाड होऊन रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली....(The Burning Truck)

नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवल्यानंतर नवीन नाशिक अग्निशमन केंद्र व अंबड एमआयडीसी केंद्राचे दोन बंबांनी येऊन ट्रकच्या केबिनला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग विझवण्यासाठी नवीन नाशिक अग्निशमन केंद्राचे आर ए. लाड, के.के पवार, एस. के. सोनवणे, एस. के. शिंदे, एस. पी. गाडेकर, इस्माईल काजी यांनी परिश्रम घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com