इगतपुरीत 'द बर्निंग ट्रेन'; तीन तासांच्या अथक प्रयत्नाअंती आग आटोक्यात

इगतपुरीत 'द बर्निंग ट्रेन'; तीन तासांच्या अथक प्रयत्नाअंती आग आटोक्यात

इगतपुरी | प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी येथील टिटोली रेल्वे यार्डात (Titoli Railway yard) मालगाडीसह इतर गाड्या रेल्वे पाणी भरण्यासाठी उभ्या केल्या जातात. आज दुपारी या रेल्वे यार्ड परिसरात उभ्या असलेल्या दुर्घटना सहायता राहत गाडीच्या डब्याला अचानक आग लागली....(Iagatpuri Railway Station)

घटनेची माहिती समजताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल तीन तासानंतर आग आटोक्यात आली.

अधिक माहिती अशी की, इगतपुरी येथे तीनच्या सुमारास अचानक रेल्वे गाडीचा एका बोगीला आग लागली असल्याची माहिती महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील (Mahindra & Mahindra company igatpuri) फायर ऑफिसर हरिष चौबे यांना मिळाली.

त्यांनी लगेचच महिंद्रा कंपनीचे फायर ब्रिगेड ला घटनास्थळी रवाना केले. रेल्वे बोगीत ऑक्सिजन सिलिंडरला आग लागली असल्याने व सिलिंडर ब्लास्ट होत असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.

रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व रेल्वे लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचारी तातडीने आग विझवण्याचे काम चालू केल्याने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

या घटनेचा रेल्वेच्या वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसुन रेल्वे एक्सप्रेसची वाहतुक सुरळीत सुरू होती. घटनास्थळी महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरिष चौबे, फायरमन मनोज भडांगे, अजय म्हसणे, ज्ञानेश्वर केणे उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com