नाशिकच्या तुफान गर्दीत 'द बर्निंग कार'; मोठा अनर्थ टळला

नाशिकच्या तुफान गर्दीत 'द बर्निंग कार'; मोठा अनर्थ टळला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नेहरू गार्डन परिसरात Nehru Garden Area सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चार चाकी वाहन एम- एच -१५ बीइ- १९०७ वाहनाने अचानक पेट घेतला car on fire. यात नाशिकरोड येथील अनंत पडवळ याच्या सह त्याची पत्नी, मुले होते.

गाडीच्या इंजिनच्या पुढील भागात शॉर्ट सर्किट मुळे धूर निघत असल्याने नागरिकांनी तात्काळ गाडीतील मंडळींना गाडी बाहेर काढले.

यावेळी बंदोबस्ताला असलेले पोलीस व अग्निशामक दलाच्या एका बंबाने त्वरित आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला. बुधवरी (दि ३) शालिमार परिसरात नागरिकांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती. मात्र लागलीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com