रणरणत्या उन्हात घेतला महागड्या दुचाकीने पेट; कुठे घडली घटना?

रणरणत्या उन्हात घेतला महागड्या दुचाकीने पेट; कुठे घडली घटना?

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या  एका मोटारसायकलने अचानक पेट घेतला. या घटनेत दुचाकी बेचिराख झाली आहे....(The burning bike in nandgaon apmc area)

या घटनेमुळे दुचाकीस्वारामध्ये सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी ही घटना घडली. सदर मोटारसायकल संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र यामध्ये आग विझविण्यासाठी लवकर पुढे कोणी आले नाही.

मात्र, आग पेट्रोल टाकीजवळ येताच प्रशांत इघे व किरण घुगे यांनी आग विझवली व पुढील अनर्थ टळला. सदर मोटारसायकल जॉन सुनील वाघ रा.दहेगांव नाका याची असल्याचे समजते. येथील कृषी उत्पन्न बाजार (APMC) समोरील आवारात आज भर दुपारी बर्निंग बाईक चा थरार तालुका भरातून आलेल्या शेतकऱ्यांनी अनुभवला.

Related Stories

No stories found.