
नवीन नाशिक | प्रतिनिधी |Navin Nashik
अंबड औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत तांब्याची चोरी जाणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी सापळा रचत सर्व मुद्देमालासह अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगिक वसाहतील वैष्णवी ऑटो.प्रा.लि.या कंपनीत ( दि.१५ मे ) रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करून १ लाख ७२ हजार रुपयांचा तांब्याच्या पार्टची चोरी केली होती. यावरून कंपनीचे व्यवस्थापक योगेश किसनराव बिडे ( ४०, रा.शिवशक्ती चौक,नवीन नाशिक ) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याप्रकरणाचा तपास करत असतांना पोलीस नाईक किरण गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निबांळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि गणेश शिंदे,सपोनि वसंत खतेले,उपनिरीक्षक संदीप पवार,अंमलदार अनिरुद्ध येवले, संदीप भुरे, हेमंत आहेर,जनार्दन ढाकणे, राकेश राउत, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, तुळशीराम जाधव, नितीन सानप, प्रशांत नागरे आदींच्या पथकाने सापळा रचत संशयित
रजनिश सुमनकुमार सिंग (२२,रा. दत्तनगर चुंचाळे अंबड नाशिक ), दिबयांशु उर्फ मन्नु कुमार सिंग (१९,रा. दत्तनगर चुंचाळे, नाशिक ) यांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वैष्णवी ऑटो.प्रा.लि.या कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करून त्यांना अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सपोनी वसंत खतेले,अंमलदार अनिल ढेरंगे करत आहेत.