झाडूला बाजारपेठेत आजही वाढती मागणी

दिवाळीचा मुहूर्त कारागिरांना सुगीचे दिवस
झाडूला बाजारपेठेत आजही वाढती मागणी

पालखेड बं.। वार्ताहर Palkhed

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या (cutting edge technology) युगात गृहिणी नवनवीन प्रकारच्या हायटेक वस्तूंना प्राधान्य देत असल्या तरी दिवाळीसाठी (diwali) शिंदीच्या पानांपासून तयार होणार्‍या झाडूलाच (broom) आजही खरेदीत प्राधान्य दिले जाते.

दिवाळी सणामध्ये (diwali festival) लक्ष्मीपूजनाला (Lakshmi Pujana) या झाडूला मोठा मान असतो. झाडू तयार करणार्‍या कारागिरांना ही दिवाळीतच रोजगार (Employment) उपलब्ध होत आहे. दिवाळीत झाडू आवर्जून सर्वच खरेदी करतात यामुळे दिवाळीनिमित्त झाडूला मोठी मागणी असते. दिवाळीच्या एक ते दोन महिने आधी ग्रामीण भागातील कारागीर या सिंधीच्या झाडांचा शोध घेतात.

त्यानंतर झाडाच्या फाट्या तोडून त्या वाळवल्या जातात त्यानंतर त्या पासून झाडू (केरसुनी) बनवला जातो. या काळात कारागिरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असतो. इतरवेळी या झाडूला कोणी विचारत नसल्याने कारागिरांचा (craftsmen) उदानिर्वाहचा प्रश्न निर्माण होत असतो. सध्या आधुनिक विविध प्रकारच्या झाडांनी आपली छाप ग्राहकांवर पाडली आहे. यामुळे पूर्वी घरात दिसणार्‍या केरसुनी चे महत्व कमी होत चालले आहे. परिणामी हाच व्यवसाय करणार्‍या कारागिरांवर संक्रात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com