
निफाड । प्रतिनिधी | Niphad
तालुक्यातील रौळस-पिंपरी (Rauls-Pimpri) येथील कादवा नदीवरील (Kadva river) पुलाची मुदत संपूनही जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
कठडे नसलेल्या पुलावर (bridge) यापूर्वी अनेकांचा अपघाती (accidents) मृत्यू झाला असून यापुढे किती जणांचा बळी घेतल्यानंतर बांधकाम विभागाला (Construction Department) जाग येईल, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे.
कादवा नदीपुलावर (Kadva river) निफाड सहकारी साखर कारखान्याने (Niphad Cooperative Sugar Factory) वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशाने पूल बांधला. त्यामुळे उस वाहतूक होण्याबरोबरच सामान्य नागरिकांच्या येण्या-जाण्याचा प्रश्न देखील पुलामुळे मार्गी लागला. या पुलाला कठडे नसल्याने अनेक अपघातांमध्ये (accidents) चार ते पाच जणांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहे. सध्या या पुलाला कठडे तर नाहीच शिवाय दोन्ही बाजूचा रस्ता खड्डेमय झाला आहे.
परिसरात ऊसाचे क्षेत्र बर्यापैकी असल्याने उस वाहतूक केली जाते. परंतु, रौळस बाजूने रस्त्यावर खड्डे (potholes) असून तीव्र चढ असल्याने अवजड वाहतुकीला अडथळा येतो. तर पिंपरी बाजुने रस्त्यावर एक किलोमीटर अंतरापर्यंत खड्डयांंचे साम्राज्य असल्याने वाहतूक धिम्म्या गतीने होते. विशेष म्हणजे सदर पुल कालबाह्य झाला असून याबाबत पिंपरी ग्रामपंचायतीकडे तसे पत्रव्यवहार देखील झाले आहेत.
असे असतांना बांधकाम विभागाने वाहतुकीच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाही. आगामी काही दिवसात निसाका सुरू होणार असल्याने संभाव्य अपघातांच्या घटना रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्यांनी केली आहे.