
दहीवड | प्रतिनिधी | Dahiwad
चिंचवे गावाजवळील धरणात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकणी देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन जालिंदर वाघ (27, रा. रामेश्वर) असे तरुणाचे नाव आहे...
देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचवे गावाजवळ मोठे एमआय टॅंक धरण आहे. त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळविले असता देवळा पोलीस स्टेशनचे हवालदार मोठाभाऊ बच्छाव व इतर कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी पाठवला.
चेतन वाघ हा जवळच असलेल्या वीटभट्टीवर काम करायचा. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत तर्कवितर्क लावले जात असून सदर घटनेबाबत देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.