अखेर बेपत्ता गवळी यांचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती

तीन तासाच्या प्रयत्नानंतर यश
अखेर बेपत्ता गवळी यांचा मृतदेह रेस्क्यू टीमच्या हाती

नाशिक | Nashik

महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व माजी रणजीपटू शेखर गवळी (४६) यांचा इगतपुरी येथे सेल्फी काढताना पाय घसरून ते दरीत कोसळले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह बचाव पथकास आढळून आला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, इगतपुरी पोलीस व इतर ट्रेकींग संस्था यांची पथके आज सकाळी ७ पासून त्यांच्या मृतदेहाचा दरीतील नदीत शोध घेत होते. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर शोध पथकास त्यांचा मृतदेह भीमवन पुलाजवळील नदी पात्रात आढळून आला आहे.

मंगळवारी (दि.१) दुपारी गवळी हे आपल्या पाच ते सहा सकार्‍यांबरोबर इगतपुरीजवळील हॉटेल मानसच्या पाठिमागील बाजुस ट्रेकींग करत होते.

दरम्यान सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून ते २५० फुट खोल दरीतील नदीत कोसळ्याची घटना सांयकाळी घडली होती. ही माहिती समजताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्णिशामक दल, तसेच इतर ट्रेकर ग्रुप यांनी त्यांचे शोध कार्य सुरू केले होते. मात्र रात्री अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते.

आज सकाळी ७ वाजेपासून पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात आले होते. यावेळी पथक हे गनाका मोटेल पासून तर उर्वरीत रेल्वे रूळावरून पलीकडे जाऊन मुंबईच्या दिशेने भीमवन पुलाजवळ उतरले होते. खोल दरी तसेच वाहते पाणी यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करत नदी किनार्‍याने पथक खाली जात राहिले.

अखेर नदी पात्रात कडेला गवळी यांचा मृतदेह आढळून आला. तो वर काढण्यात येऊन ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com