इंदिरानगर ।वार्ताहर

तीन दिवसांपुर्वी इंदिरानगर भागातून चारचाकी गाडीसह बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह गंगापूर गावच्या पुढे हॉटेल गंमत जंमत परिसरात गाडीतच सापडल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबिय परस्पर विरोधी माहिती देत असल्याने यातील गुढ वाढले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपर्णा सुब्रोतनाथ रॉय (20, राहणार पार्कसाईट इंदिरानगर) ही युवती सोमवार (दि.7) पासून चारचाकी गाडी क्रमांक एमएच 31, डीके 5188 सह बेपत्ता होती. याबाबत तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

याबाबत इंदिरानगर पोलीस तपास करत असताना गंगापूर गावच्या शिवरातील हॉटेल गंमत जंमतच्या परिसरात मंगळवारी रात्री तिचा मृतदेह गाडीतच मिळून आला. ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत तालुका व इंदिरानगर पोलिस तपास करत आहेत दरम्यान कुटुंबियांनी मंगळवारी रात्री रूग्णालयात दाखल करताना ही मुलगी जीवंत होती.

परंतु प्रवासात तीचा मृत्यू झाल्याचे पोलीसांना सांगीतल्याचे तालुका पोलीस सांगत आहेत. तर तिचे शवविच्छेदन करणार्या सुत्रांच्या माहितीनुसार तिच्या शरिराला दुर्गंधी सुटली असल्याने मृत्यू दोन दिवसांपुर्वीच झाला आहे. पंरतु तीची हत्या करण्यात आल्यासारख्या काही खानाखूना आढळून आल्या नसल्याचेही सांगीतले. अशा परस्पर विरोधी प्रकारांमुळे या घटनेतील गुढ अधिक वाढले आहे.