
इगतपुरी | जाकीर शेख | Igatpuri
तालुक्यातील देवळे परिसरात (Devle Area) मासेमारी करण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ तीन दिवसांपूर्वी दारणा नदी पात्रात (Darna River) बुडाल्याची घटना घडली होती. त्यानंतर तीन दिवसांपासून त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर आज सकाळच्या सुमारास दोन्ही भावडांचे मृतदेह (Dead Body) सापडले आहेत..
याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज काशिनाथ पिंगळे व कृष्णा काशिनाथ पिंगळे रा.आवळखेड असे मृत्यू झालेल्या दोन सख्या भावांची नावे आहेत. हे दोघेही मासेमारी (Fishing) करत असताना त्यापैकी एक नदीत बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्याचा दुसऱ्या भावाने प्रयत्न केला.
मात्र भावाला वाचवत काठावर आणत असतांना अचानक दोघेही पुन्हा पाण्यात (Water) पडल्याने बुडाले (Drowned) होते. त्यानंतर दोन्ही युवकांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नव्हते. अखेर आज सकाळच्या सुमारास दोन्ही भावांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.
यानंतर स्थानिक नागरिकांनी घोटी पोलिसांना (Ghoti Police) कळविले असता दोघांचे मृतदेह पुढील तपासणीसाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात (Ghoti Rural Hospital) पाठवण्यात आले. तसेच या शोधकार्यासाठी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, महिंद्राचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आटोकाट प्रयत्न केले होते.
तर कसारा (Kasara) येथील आपत्ती टीमचे शाम धुमाळ, योगेश साखरे, देवा वाघ, धर्मेंद्र ठाकुर, मच्छींद्र गांगड, कृष्णा कामडी, भगवान दरवडे, नवनाथ आघाण, सावन कातोरे यांच्यासह आदींनी मृतदेह शोधण्यासाठी मदत केली.