दिंडोरी
दिंडोरी
नाशिक

दिंडोरी : जोडप्याचे मृतदेह विहीरीत आढळल्याने खळबळ 

इंदिरानगर येथील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी । Dindori

दिंडोरी शहरातील इंदिरानगर येथील विवाहित जोडप्याचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून मृत्यूचे नेमके कारण समजु शकले नाही.

दिंडोरी येथील इंदिरानगर परिसरातील उमराळे रोडवर मवाळ यांच्या विहीरीत दोन मृतदेह पडले असल्याचे सकाळी लक्षात आले. पोलिसांच्या मदतीने ते मृतदेह बाहेर काढले. दोघां मृतदेहाचा ओळख पटवली असता ते इंदिरानगर येथील रहिवाशी असलेले दत्तू उखा पवार (४६) व संगीता दत्तू पवार यांचे ते असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शव आणण्यात आले असून पुढील प्रक्रिया सुरु आहे. घरगुती वादातून ही घटना घडल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com