
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
शहरातील चौकांचे सीएसआर निधीतून (CSR Fund) सुशोभीकरण (beutification) व्हावे, याकरिता तत्कालीन आयुक्त रमेश पवार (ramesh pawar) यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार शहरातील काही भागात चौकाचे सुशोभीकरण झाले आहे.
दरम्यान नाशिकरोड (nashik road) परिसरातील चौक सुशोभीकरणाकडे पालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील (Nashik Road Divisional Office) उपअभियंता यांच्याकडून खो घातल्याचे दिसत आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वीच चौक सुशोभीकरण (beutification) संदर्भात विभागीय अधिकार्यांनी पत्र दिल्याचे सांगितले जात आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनीच लक्ष घालावे, अशी मागणी होते आहे.
सीएसआर फंडातून होणार्या कामांना उपअभियंत्यांच्या अशा वागण्यामुळे नाशिकरोडमधील चौक सुशोभीकरण खोळंबले आहे. यापूर्वी शहरातील रविवार कारंजा, मेनरोड यासह विविध भागातील मुख्य चौकाचे, कारंजाचे सुशोभीकरण झाले आहे. असेच सुशोभीकरणाचे काम नाशिकरोड परिसतीतल वॉस्को चौकाचे होणार होते.
या चौकाचे काम करून त्याचे क्रांती चौक असे नामकरण केले जाणार आहे. यासाठीचा सर्व खर्च नाशिकरोड (nashik road) येथील जयराम रुग्णालय स्वत: करणार आहे, तसेच बिटको पॉइट ते दसकपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील डिव्हाडरचे (devidor) सुशोभीकरण करन्सी नोट प्रेस करणार आहे. तर नाशिकरोडकडून महसूल कार्यालयाकडे (Revenue Office) जाणार्या रस्त्यावर इडिया सिक्युरीटी प्रेस (India Security Press) (आयएसपी) मोठी कमान लावून काम करणार आहे.
मुख्य म्हणजे या कमानीवर नाशिकरोडच्या रस्त्यांच्या माहितीबरोबरच आयएसपी संदर्भातील माहिती दिली जाणार आहे. दरम्यान ही कामे तत्काळ व्हावीत, यासाठी नाशिकरोड येथील बांधकाम विभागाकडून परवानगी मिळ्णे आवश्यक आहे. काम करताना कसे करावे. कोणत्या नियमानुसारे करावे, किती जागा सोडावी, जेणेकरुन भविष्यात कोणताही त्रास होता कामा नये, याकरिता बांधकाम विभागाकडून (Construction Department) यास हिरवा कंदिल मिळ्णे आवश्यक आहे. याकरिता नाशिकरोडच्या विभागीय अधिकार्यांकडून पत्रही दीड महिन्यापूर्वी दिल्याचे समजते.