लष्कर भरतीवरील बंदी उठवावी

जिल्ह्यातील इच्छूक युवकांची खा. गोडसेंकडे मागणी
लष्कर भरतीवरील बंदी उठवावी

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

करोनाच्या Corona पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून लष्कर भरती बंद आहे. त्यामुळे युवकांचे स्वप्न धुळीस मिळत आहे. भरतीवरील army recruitment बंदी तातडीने उठवावी, तसेच दोन वर्षांची वयोमर्यादा वाढवून नोव्हेंबरमध्ये होणारी भरती प्रक्रिया पुढे ढकलू नये, अशी मागणी जिल्ह्यातील युवकांनी खा. हेमंत गोडसे MP. Hemant Godse यांचेकडे केली असता याबाबत आपण संबंधित विभागाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

सध्या भरती प्रक्रिया बंद असल्याने वर्षानुवर्षे लष्कर भरतीसाठी तयारी करणार्‍या हजारो तरूणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकांचे वय वाढत चालल्याने भरती झाली नाहीतर या विचाराने इच्छुकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी भगूर, देवळाली कॅम्प, नाशिकरोडसह ग्रामीण भागातील इच्छुकांच्या शिष्टमंडळाने खा.गोडसे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

करोनामुळे दोन वर्षांपासून भरती बंद असल्याने इच्छुकांचे वय वाढल्याने इच्छुकांना भरती प्रक्रियेच्या वयात दोन वर्षांची मुदतवाढ मिळावी. येत्या नोव्हेंबरमध्ये प्रस्तावित भरती असून करोनाची तिसरी लाट आली तरी प्रस्तावित भरती पुढे ढकलू नये, गर्दी होण्याची भिती असल्यास ही प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात राबवावी आदी मागण्यांचे साकडे घालण्यात आले.

यावेळी वैभव गायकवाड, करण गायकर, शुभम वाघचौरे, प्रज्वल आव्हाड, सनी काळे, रोशन गायकवाड, ओंकार गावडे, विशाल घोरपडे, देवेंद्र गायकवाड, सौरभ जाधव आदी युवक उपस्थित होते. याविषयी आपण केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन खा. गोडसे यांनी शिष्टमंडळाला दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com