नाशिकच्या यश डबेला ‘श्रीसंग्राम श्री’ किताब

नाशिकच्या यश डबेला ‘श्रीसंग्राम श्री’ किताब

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय दिल्ली मान्यताप्राप्त इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन व महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असोसिएशन Maharashtra Bodybuilding Association संलग्न नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या Nashik District Bodybuilding Association सहकार्याने टिटोलीचे सरपंच अनिल भोपे यांच्या वतीने श्रीसंग्राम सोशल ग्रुप, टिटोली आयोजित श्रीसंग्राम श्री2021 Shri Sangram Shri 2021चा मानाचा किताब नाशिकच्या यश डबे Yash Dabe याने पटकावला. बेस्ट पोजरचा मान इगतपुरीच्या पवन पवारने मिळवला. तसेच मोस्ट इम्प्रूव्हड बीबी स्टॉउंच जिमचा मो.कुरेशी याला देण्यात आला.

स्पर्धेचे उद्घाटन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युवानेते संदीप गुळवे,अनिल भोपे, लहामगे, रमेश जाधव, गोपाळ गायकवाड, तुषार तिडके, रविंद्र वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत नाशिक जिल्हाभरातील विविध गटांमध्ये एकूण 84 शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे घोटी-इगतपुरी,त्र्यंबकेश्वर, वणी-दिंडोरी, सिन्नर, लासलगाव-निफाड, येवला, चांदवडसारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंची संख्या लक्षणीय होती.स्पर्धक जास्त असल्यामुळे अतिशय चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेला प्रेक्षकांनी शासनाचे नियम पाळत खेळाडूंना भरभरून प्रतिसाद दिला.

स्पर्धेचे पंच म्हणून गोपाळ गायकवाड, श्रीराम जाधव,रवींद्र वरपे, राहुल पंडित, दिनेश भालेराव, अमोल जाधव, संकेत घोडके,अमन शेख, सूत्रसंचालक तुषार तिडके,स्टेज मार्शल हिमांशू गायकवाड, सचिन लहामगे, श्रीकांत बागुल, फोटोग्राफी दिग्विजय गायकवाड यांनी उत्तम पध्दतीने केले.विजयी शरीरसौष्ठवपटूंना बक्षीस वितरण बोंडे, भरत गभाले,संदीप भडांगे, मिनानाथ कडू, हाडप आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल

55किलो: 1) कृष्णा पिंगळे,2) पांडुरंग माळी,3)श्रीगणेश देवाडिगा,4) विक्रम साळी,5)ओमकार चव्हाण 60किलो:1) पंढरी बोंडे,2) मंगेश नागरे,3) मंसुरी शहाज,4) आदर्श पवार, 5) विघन शेख, 65 किलो:1) दिनेश बागडे,2) मनोज सदगीर,3)यतीन जोशी,4) साहील शेख,5)फैज शेख 70 किलो:1) पवन पवार,2) महेश बटाटे,3) अमिन अन्सारी,4) आकाश बोंडे,5) आकीब खान, 75 किलो: 1) यश डबे,2) अजय निषाद,3) गोरख सांगळे,4) राकेश देवरे,5) ललित थोरात, 75 किलोवरील : 1)मो.कुरेशी,2)कुरेशी असलम,3)शाहबाज शेख,4)आकाश झाकणे,5)पियुष केदारे

Related Stories

No stories found.