निमा हाऊस
निमा हाऊस
नाशिक

निमा निवडणुकीच्या निर्णयायाकडे उद्योजकांचे लक्ष

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी satpur

नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन अर्थात निमा उद्योजकांच्या संघटनेमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान कार्यकारिणीची मुदत शुक्रवारी (दि.३१ जुलै) रोजी संपली. विरोधकांनी पुढेे आणलेली २००४ ची संस्थेची कोणतीही घटना अस्तित्वात नाही. त्यामुळे यापुढील काळात काय करायचे, याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले आहे. त्यांचा निकाल येईपर्यत विद्यमान कार्यकारिणीच कारभार करणार असल्याचे निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी स्पष्ट केले.

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ही जिल्ह्यातील उद्योजकांचे अग्रणी संघटना आहेत. संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात होत असलेल्या राजकारणामुळे आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निमा संघटनेत निवडणुक घ्यावी, अशी विरोधकांकडून जोरदार मागणी झाली.

त्यानंतर विश्‍वस्त मंडळाने निवडणुक समितीची नियुक्ती केली. सत्ताधारी कार्यकारिणीने जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन कोरोनामुळे निवडणुकीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी औद्योगिक संघटना धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत असल्याचे स्पष्ट करीत याबाबत धर्मदाय आयुक्तांनी निर्णय घ्यावा, असा आशयाचे पत्र पाठविले.

त्यानंतर धर्मदाय आयुक्तांकडे अद्याप कोणतेही मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. त्यामुळे जर ३१ जुलैला विद्यमान कार्यकारिणी विर्सजीत होणार असेल तर विश्‍वस्त मंडळ देखील बरखास्त होणे आवश्यक आहेत. विश्‍वस्त मंडळाला निमा संघटनेबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारी नसल्याचे शशिकांत जाधव यांनी स्पष्ट केले.

राज्यातील अग्रगण्य अशा महाराष्ट्र चेंबर आणि आयमा संस्थेच्या विद्यमान कार्यकारिणीला देखील 3 महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे आता निमा संघटनेच्या निवडणुकीबाबत रविवारी (दि.२) रोजी सत्ताधारी आणि विरोधक कोणती भुमीका घेतात, याकडे उद्योग वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहेत.

निमा संघटना धर्मदाय आयुक्तांच्या अख्यारीत काम करते. आज पर्यत ५० वर्षाच्या इतिहासात सत्ताधार्‍यांनी संस्थेची साधी घटना देखील मंजूर करून घेतली नाही. सत्ताधारी कार्यकारिणीने धर्मदाय आयुक्तांकडे घटनेसाठी पाठपुराव्या केल्यानंतर विरोधी गटाचे सदस्य अनुपस्थित राहीले. जर धर्मदाय आयुक्तांकडे दिलेल्या तारखेला विरोधी सदस्यांनी देखील हजेरी लावली असती आणि पाठपुरावा केला असता तर आज घटनेनुसार पुढील कार्यवाही करता आली असती.

- शशिकांत जाधव, विद्यमान अध्यक्ष निमा

Deshdoot
www.deshdoot.com