
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road
डॉक्टर्स (doctors) रुग्णाची (Patient) आर्थिक लुटच करतात असा डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टीकोन सध्या आहे. परिणामी या पेशातील समस्यांचे स्वरूप अधिक गंभीर बनले आहे.
अशा परिस्थितीत संघटन अपरिहार्य झाले असून इंडियन मेडिकल असोशिएशन (Indian Medical Association) डॉक्टरांना सामाजिक आणि व्यावसायिक संरक्षणाचे (Social and occupational protection) दायित्व निभावते, असे प्रतिपादन जागतिक वैद्यकीय संघटनेचे (World Medical Association) खजिनदार डॉ. रवी वानखेडकर (Dr. Ravi Wankhedkar) यांनी येथे केले.
नाशिकरोड (nashik road) इंडियन मेडिकल असोशिएशन शाखेने राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोशिएशन (National Indian Medical Association) पंचावन्न आजीवन सदस्य बनविण्याची कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर या शाखेच्या कार्यकारिणीच्या गौरव समारंभात डॉ. रवी वानखेडकर उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. शितलकुमार जाधव हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणुन इंडियन मेडिकल असोशिएशन राज्य उपाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे हे होते. इंडियन मेडिकल असोशिएशन ही सार्वजनिक विश्वस्त संस्था असून जनतेचा या संस्थेवर विश्वास आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रात ऐक्य आणि जबाबदारी स्विकारण्यासाठी पुढे येण्याचा अभाव दिसून येतो, असा खेदही डॉ.रवी वानखेडकर यांनी व्यक्त केला.
ऐक्य आणि संघटन यातच आपले भविष्य सुखकार असणार आहे. नाशिकरोड इंडियन मेडिकल असोशिएशन हाऊस येत्या पाच वर्षांत उभारण्याचे ध्येय समोर ठेवून ते पूर्णत्वास न्यावे असे आवाहनही डॉ.रवी वानखेडकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी स्थूलत्व आणि शस्त्रक्रिया या विषयावर डॉ. संदीप सबनीस यांनी व्याख्यान दिले. यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांच्याकडे डॉ. रवी वानखेडकर यांच्या शुभहस्ते साडेतीन लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी नाशिकरोड असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. शितलकुमार जाधव उपाध्यक्ष डॉ नितीन सुराणा, सचिव डॉ.निशांत घोडके, खजिनदार डॉ. स्वप्नांजली आव्हाड, सहखजिनदार डॉ. अनिल कानडे, डॉ. प्रविण जाधव, डॉ. दिप्ती पापरीकर, डॉ.प्रीतेश जुनागडे आदी उपस्थित होते.