कॅन्टोन्मेंटच्या व्हॅरीड बोर्डावर नाव कोणाचे लागणार; दिल्लीत मोर्चेबांधणी
cantonment board

कॅन्टोन्मेंटच्या व्हॅरीड बोर्डावर नाव कोणाचे लागणार; दिल्लीत मोर्चेबांधणी

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

देवळालीसह (Deolali) देशभरातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डवर (Cantonment Board) जनतेचा प्रतिनिधी (Representative of the people) नेमणेकामी सुरू असलेल्या शासकीय कार्यवाहीकडे राजकीय पक्षांचे सूक्ष्म लक्ष असून देवळालीसाठी इच्छुकांनी प्रशासनाकडे अर्ज जमा केले आहेत.

बोर्डाचे अध्यक्ष व सचिव यांनी पसंतीक्रमानुसार काही नावे केंद्राकडे पाठवले असले तरी यंदा प्रथमच पक्षीय पातळीवर हस्तक्षेप वाढल्याने कोणाची नियुक्ती होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. अर्ज केलेल्यांपैकीच नाव पाठविणे सक्तीचे नसल्याने या व्यतिरिक्तदेखील नाव पाठविले जाऊ शकते.

यासाठी इच्छुकांनी दिल्लीत मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सध्या राज्यात शिवसेना (Shivsena) व भाजपा (BJP) या दोन्ही पक्षात विळ्या-भोपळ्याचे वैर असल्याने राज्यातील सर्व कॅन्टोन्मेंटवर भाजपचे सदस्य नियुक्त होण्याचे संकेत राजकीय गोटातून दिले जात आहेत.

देशभरात 62 कॅन्टोन्मेंटपैकी 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कार्यकाळ संपल्यावर कायद्याच्या चौकटीत दोन वेळा 6-6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्यावर 8 फेब्रुवारी रोजी बोर्ड बरखास्त झाले व व्हॅरिड बोर्डाची नियुक्ती (Appointment of Warid Board) करताना बोर्ड अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती झाली.

या शिवाय नागरी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यासाठी रक्षा मंत्रालया (Ministry of Defense) कडून सर्व कमांड कार्यालयांना आदेशीत करून 19 मार्चपर्यंत प्रत्येक कॅन्टोन्मेंटसाठी 3 नावे पाठविणे बाबत सूचना देण्यात आल्यात. राज्यात देवळाली (नाशिक), पुणे, खडकी, देहूरोड (पुणे), भिंगार (अहमदनगर), कामठी (नागपूर), औंरगाबाद या पाच जिल्ह्यातील 7 कॅन्टोन्मेंटचा समावेश आहे.

नाशिक (Nashik) येथे शिवसेना, औरंगाबाद येथे एमआयएमचे खासदार आहेत तर पुणे व अहमदनगर येथे भाजपचे खासदार आहेत. शिवाय या सर्व सातही कॅन्टोन्मेंटवर भाजपाची सत्ता होती. त्यामुळेच या सर्व ठिकाणी पुन्हा भाजपचे सदस्य नियुक्त करणेसाठी प्रदेश भाजपाने हालचाली गतिमान केल्या आहेत.

शिवसेना खासदार हेमंत गोडसे (Shiv Sena MP Hemant Godse) यांना ही बाब माहिती असल्याने त्यांनी तब्बल 10 कार्यकर्त्यांना नियुक्ती होणेसाठी शिफारस पत्र देऊन सर्वांचे समाधान केल्याचे बोलले जात आहे.

बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील नावे पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, नेमके कोणाची नावे पाठविण्यात आली हे गुलदस्त्यात आहे,पक्षीय पातळीवर कार्यकर्त्यांची सोय करण्यात येणार असल्याचे चर्चांना सध्या मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे.

यात गावाचा विकासाठी झटणार्या व्यक्तीची नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.या प्रक्रियेत आठ माजी उपाध्यक्षांसह भाजप, शिवसेना, आरपीआय (RPI), काँग्रेस (Ongres Party), राष्ट्रवादी तसेच सामाजिक कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. कायद्याच्या तरतुदीनुसार नियुक्ती होणारी व्यक्ती ही त्या हद्दीतील रहिवासी असावी लागते. तरी देखील नाशिक येथील दोघांनी यासाठी अर्ज केला आहे. मुळात अर्ज केलेल्या पैकीच कोणाची नियुक्ती करावी असा कायदा नसल्याने याचे व्यतिरिक्त देखील नियुक्ती होऊ शकते.

दिल्लीत मोर्चेबांधणी

या बाबतची प्रक्रिय दिल्ली दरबारात असल्याने बोर्डाचे जेस्ट नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी भाजपचे चे जेस्ट नेते यांची भेट घेऊन पक्षासाठी हे पद कसे उपयोगी असल्याचे सांगितले, याशिवाय भाजपच्या अनुसूचित जाती जमाती च्या प्रदेश उपाध्यक्ष प्रीतम आढाव (State Vice President of Scheduled Castes and Scheduled Tribes Pritam Adhav) या भाजपा च्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (BJP's state vice president Chitra Wagh) यांचे माध्यमातून पर्यंतशील आहेत, तर वृक्षमित्र तानाजी भोर यांनी भाजपा मध्ये प्रवेश करीत मंडळ अध्यक्ष मधुसूदनस गायकवाड यांचे सह दिल्ली येथे पक्षाचे वरिष्ठ नेते यांची भेट घेतली आहे, याशिवाय रिपाई नेते विश्वनाथ काळे यांनी देखील केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले (Union Social Minister Ramdas Athavale) यांचे माध्यमातून प्रयन्त चालविले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com