म्हाळसाकोरेची रुग्णवाहिका बेवारस स्थितीत

म्हाळसाकोरेची रुग्णवाहिका बेवारस स्थितीत
Artist-freed

मांजरगाव । वार्ताहर Manjergaon-Niphad

माजी आमदार अनिल कदम (Former MLA Anil Kadam) यांनी म्हाळसाकोरे व परिसरासाठी दिलेली रुग्णवाहिका (Ambulance) गेल्या सहा महिन्यापासून गावातून गायब असून ती कुठेतरी गावाबाहेर बेवारस स्थितीत लावुन दिली असून यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे. असे असतांनाही विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. साहजिकच रुग्णांना आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

गोदाकाठच्या पाच सहा गावांना वरदान ठरलेली व अनेकांचे प्राण वाचवणारी मग ते रात्रीचे कितीही वाजता पेशंट नेण्याची वेळ असली तरी रुग्णवाहिकेचा चालक तयार असायचा. अनेक गावकर्‍यांनी आम्हाला खासगी वाहने परवडत नाही आणि रात्री-अपरात्री खासगी वाहनावाले येत नाही. नाईलाजास्तव मोटारसायकलवर रुग्णाला न्यावे लागते.

माजी आमदार अनिल कदम यांनी आमदार निधीतून (MLA fund) या गावांना रुग्णवाहिका दिली होती. सध्या ही रुग्णवाहिका जवळच एका पेट्रोल पंपावर बेवारस स्थितीत असून ग्रामपंचायतीला विचारले असता चावी सापडत नाही असे किरकोळ कारण सागितले जाते. याच ग्रामपंचायत सदस्यांपैकी एक सदस्य कमलाकर राऊत हे गाडीचा पुर्ण खर्च करुन स्वत: चालविण्यास मागत होते. त्यांनी त्याबाबत ग्रामपालिकेला तीन वेळा विचारले. ग्रामपालिकेला त्या बदल्यात रुग्णवाहिकेचे भाडे मिळणार होते. परंतु ग्रामसेवक व इतर सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

यापुर्वी ही रुग्णवाहिका सुरू होती. त्यावेळी ग्रामपंचायतीला एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. नेमके सहा महिन्यापूर्वी ग्रामपालिकेची निवडणूक झाली अन् या रूग्णवाहिकेची चावी हरवली हा देखील एक योगायोगच म्हणावे लागेल. सध्या करोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे शासन या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणेसह तयारी करीत असतांना येथे मात्र रुग्णवाहिका चावी वाचून उभी आहे आणि तीही गावापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर अन् बेवारस स्थितीत. त्यामुळे ग्रामपालिकेने रुग्णांच्या जीवाशी न खेळता ही रुग्णवाहिका भाडेतत्वावर किंवा ग्रामपालिकेने स्वत: चालक पाहून चालू ठेवणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com