खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशासन कटिबद्ध

विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे प्रतिपादन
खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रशासन कटिबद्ध

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

जिल्ह्यासह राज्याचे नाव उज्ज्वल करणार्‍या राष्ट्रीय धावपटूंना national runners संपूर्ण प्रशासकीय पाठबळ देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे Divisional Revenue Commissioner Radhakrishna Game यांनी केले.नाशिकच्या एकलव्य अथेलटिक्स अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट Eklavya Athletics and Sports Institute आयोजित एशियन गेम्सच्या पात्रता फेरीत दाखल झालेल्या राष्ट्रीय धावपटूंचा सत्कार व ग्रामीण भागातील उदयोन्मुख धावपटूंना ट्रॅक सूट वाटपाच्या कार्यक्रमात आयुक्त गमे बोलत होते.

व्यासपीठावर क्रीडा व युवक नाशिक/मुंबई विभागाचे उपसंचालक संजय महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्रसिंग, ऑलिम्पिक धावपटू कविता राऊत, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सीएसआर प्रमुख तुषार जोशी आदी उपस्थित होते. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शासकीय बैठकीच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून खेळाडूंचे विशेष कौतुक केले.

याप्रसंगी गमे म्हणाले, धावपटूंच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य आहे.खेळाडूंनी आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सुदृढ मानसिकता ठेवून अधिक परिश्रम करावे. आगामी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे नाव उज्वल करण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खेळाडूंसाठी लसीकरण, आरोग्य शिबीर अथवा तत्सम शासकीय उपक्रमाबाबत थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही गमे यांनी केले.

प्रास्ताविकातून प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी एकलव्य इन्स्टिट्यूटची माहिती विशद करतांना सांगितले की, तेलंगणा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण पदकांपैकी नाशिकचा वाटा सर्वाधिक आहे. गेल्या दहा वर्षांपासून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने या खेळाडूंचे पालकत्व स्वीकारल्याने धावपटूंना आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता येणे शक्य होते.

यावेळी महिंद्रा कंपनीचे अधिकारी तुषार जोशी यांनीही मनोगतातून कंपनी खेळाडूंच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभी असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन संजय लोळगे तर आभार अनिल वाघ यांनी मानले. यानंतर एशियन गेम्सच्या पात्रता फेरीत दाखल झालेल्या संजीवनी जाधव, कोमल जगदाळे, आदेश यादव, दिनेश सिंग, अजय राठी, पल्लवी जगदाळे, रिंकी पावरा या धावपटूंचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सुरगाणा, उंबरठाण, दिंडोरी या भागातील धावपटू उपस्थित होते.

मातीशी नाळ जुळलेल्या ग्रामीण भागातील धावपटूंच्या मेहनतीचे मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले. क्रीडाविश्वात ग्लोबल व्हिजन असणार्‍या या धावपटूंसोबत अधिकार्‍यांनी छायाचित्र काढण्याचा केलेला आग्रह या खेळाडूंचे मनोबल उंचावणारा ठरला.

Related Stories

No stories found.