नाशिक जि. प. च्या 'त्या' कामगिरीची सर्वत्र चर्चा; द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्येही नोंद

जि. प. नाशिक
जि. प. नाशिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र राज्याच्या जनतेस त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील जिल्हा परिषद  या सर्वोच्च संस्थेच्या सर्वसाधारण सभांचे  पंचवार्षिक सभांचे इतिवृत्त पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली आणि एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. या प्रकाशन उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या या विक्रमाची नोंद द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस (natinal record) राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे...

याचे प्रकाशक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे आणि जी.पी. खैरनार (संकलक) यांनी हे पुस्तक प्रसिद्ध करून ग्रामीण भागातील वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्यात प्रथमच जिल्हा परिषद,नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

भारत हा एक लोकशाही देश असून ग्रामीण भागातील जनतेत स्थानिक विकास साधण्यासाठी तथा जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यासाठी देशपातळीवर व राज्य पातळीवर ग्रामविकास विभाग स्वतंत्रपणे निर्माण केला गेला आहे. महाराष्ट्र राज्यातील त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करून जनतेस मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामविकास विभागामार्फत केला जातो.

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याप्रमाणे त्रिस्तरीय प्रणाली कार्यान्वित आहे. पंचायत राज प्रणाली मधील जिल्हा परिषद ही ग्रामीण भागात शासनाच्या बहुविध योजनांच्या अंमलबजाव करणारी व प्रत्यक्ष योजना राबविणारी सर्वोच्च संस्था आहे.नाशिक जिल्हा परिषदेने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील लोकनियुक्त लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या माध्यमातून होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतीवृत्त ' ग्राम विकासाची शाळा ' या नावाने पुस्तक रुपात प्रसिद्ध केले आहे.

या पुस्तकात 21 मार्च 2011 पासून 20 मार्च 2017 या कालावधीत झालेल्या सभांचे 1001 ठराव नमूद असून ग्रामीण भागातून नेतृत्व करणाऱ्या नवख्या युवकांना या पुस्तकातून ग्राम विकासाचा गाडा कशाप्रकारे चालतो, याचा बोध होणार आहे.

ग्रामीण जनतेसाठी शासनाच्या योजना, प्रत्यक्ष लाभार्थी, व्यक्तीस लाभ देण्याची पद्धती, विविध विकास योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणारी जिल्हा परिषद नाशिक ही राज्यातील पहिली एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद यांना मार्गदर्शक ठरलेल्या या प्रकाशन उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या विक्रमाची नोंद दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com