नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

गेल्या आठवड्यात सामनगाव रोड परिसरातील अरिंगळे मळा येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या सहाजणांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळा येथे एका अल्पवयीन मुलीवर रवी कुर्हाडे, आकाश गायकवाड, दिपक खरात, सूनील कोळे, सोमनाथ खरात या व एका अल्पवयीन मुलाने परिसरात राहणार्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.

सदर घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलिसांमध्ये या सहा जणांविरुद्ध तसेच त्यांना मदत करणार्या पूजा वाघ या महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या सर्वांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली होती.

या सर्वांना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली. त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने सर्व सहा संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या सर्वांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.