कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ

साखर कारखाना
साखर कारखाना

ओझे l विलास ढाकणे | Oze

कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Sahkari Sakhar Karkhana) 46 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार दि.1 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या हस्ते होणार आहे...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) राहणार आहे. ॲड. बाजीराव कावळे, खासदार हेमंत गोडसे, माजी खा. देविदास पिंगळे, माजी खासदार समीर भुजबळ, मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, सुहास कांदे, सरोजताई अहिरे,नरेंद्र दराडे,हिरामण खोसकर, नीलिमाताई पवार, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, शिरीषकुमार कोतवाल, धनराज महाले, रामदास चारोस्कर, जयंत जाधव, संजय चव्हाण, जे.पी.गावित, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, रवींद्र पगार आदी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सौ. व श्री. विलास कड,सौ. व श्री.राजाराम भालेराव,सौ. व श्री. भरत देशमुख,सौ. व श्री.रामदास मातेरे,सौ. व श्री.परिक्षीत देशमुख,सौ. व श्री.नारायण पालखेडे यांचे हस्ते गव्हाण पूजा होणार आहे.सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते,कार्यकारी संचालक हेमंत माने व संचालक मंडळाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com