
देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devlali Camp
देवळाली कॅन्टोन्मेंट (Dewalali Cantonment) हद्दीतील भगूर बस स्थानकालगत (Bhagur Bus Station) असलेल्या भुयारी मार्गालगतचा (subway) परिसर धोकादायक बनला असून
लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालताना खड्ड्यात पडून मोठा अपघात (accident) होण्याची शक्यता असल्याने कॅन्टोन्मेंट प्रशासनासह (Cantonment Administration) रेल्वे विभागाने (Railway Department) याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घुगे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. भगूर बसस्थानकाच्या पाठीमागून जाणार्या रेल्वे मार्गावर देवळाली कॅम्पकडून (devlali camp) भगूरमध्ये जाण्यासाठी नवीन बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे.
हे करत असताना बोगद्यालगत असलेल्या नागरी वसाहतीचा काही भाग अगदी रस्त्यालगत आहे. तसेच या ठिकाणी जामा मस्जिद असून या बोगद्याचे काम चालू असताना जवळचा मातीचा ढिगारा काही दिवसात खचून तेथे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा खड्डा जीवघेणा ठरू शकतो.
याबाबत स्थानिक नागरिकांनी कॅन्टोममेन्ट प्रशासन (Cantonment Administration) व रेल्वेकडे तक्रारी नोंदवलेले आहेत, मात्र त्याची दखल घेतली जात नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शशिकांत घुगे यांनी पुढाकार घेऊन कॅन्टोन्मेंट प्रशासन व रेल्वेने सदरचा खचून चाललेला मातीचा भरावा व पडलेला खड्डा कायमस्वरूपी बंदिस्त करावा. जेणेकरून नागरिकांना धोका निर्माण होणार आहे.
अन्यथा जनआंदोलन (agitation) छेडण्याचा इशारा घुगे यांचेसह इकबाल शेख, इम्तियाज शेख, अरिफ पटेल, सुमित पटेल, जुबेर पटेल, जमील शेख, परसराम साठे, संपतराव साठे, शरद साठे, सीताबाई साठे आजर शेख, नाझीम बाबा, मन्सूर शेख, शमशेर शेख आदींनी दिला आहे.