'तो' खून प्रेम प्रकरणातून; पोलिसांनी उलगडले रहस्य

'तो' खून प्रेम प्रकरणातून; पोलिसांनी उलगडले रहस्य

ओझर । वार्ताहर | Ozar

ओझर पोलीस ठाण्याच्या (Ozar Police Station) हद्दीत 12 जानेवारीला आंबेडकरनगर परिसरात झालेला खून (murder) प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. येथील आंबेडकर नगरमधील प्रमोद दत्तू निकाळजे (वय 32) या तरूणाचा अज्ञात आरोपींनी कुठल्या तरी हत्याराने वार करून खून केला होता.

याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात (Ozar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व ओझरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.

मयत प्रमोद निकाळजे या तरुणाविषयी सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू होते. परिसरातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना पोलीस पथकाने सविस्तर विचारपूस केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी मयताचे दोन व्यक्तींसोबत वाद झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आल्यानंतर ओझर (ozar) गावातून संशयित जयेश देवराम भंडारे व रावसाहेब उर्फ संदिप मधूकर बनसोडे (दोन्ही रा.आंबेडकर नगर, ओझर) यांना ताब्यात घेतले.

सखोल चौकशी केली असता त्यांनी 12 जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास प्रमोदवर तलवार (sword), चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची कबुली संशयितांनी दिली. दरम्यान, मयत प्रमोद निकाळजे व संशयित आरोपी जयेश भंडारे या दोघांचे ओझर येथील एकाच महिलेशी प्रेमसंबंध होते. यावरून दोघांमध्ये वाद होवून संशयित आरोपी जयेश भंडारे व त्याचा मित्र संदिप बनसोडे या दोघांनी प्रमोदचा काटा काढला. संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस तपास करत आहे.

गुन्ह्याच्या तपासात अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, ओझरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना तोडमल, पोलीस हवालदार किशोर आहेरराव, पोलीस नाईक विश्वनाथ धारबळे, दीपक गुंजाळ,

अनुपम जाधव, बंडू हेगडे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र बागुल, रमेश चव्हाण, झांबरू सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे, पोलीस हवालदार जालिंदर खराटे, पोलीस नाईक नवनाथ वाघमोडे, रवींद्र टलें, सागर काकड यांच्या पथकाने भूमिका पार पाडली. दरम्यान, गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी तपास पथकास 15 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com