‘त्या’ डॉक्टरची सनद होणार रद्द
USER

‘त्या’ डॉक्टरची सनद होणार रद्द

पोलिसांकडून महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीकडे प्रस्ताव

नाशिक । प्रतिनिधी

रेमडेसिवीर औषधाच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत काळाबाजार करणार्‍या डॉक्टरची सनद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या कुलसचिवांना पाठवला आहे. यामुळे कोणत्याही क्षणी सबंधित डॉक्टरची होमिओपॅथीची सनद रद्द होऊ शकते तसेच औषधांचा काळाबाजार करणारांना धडा मिळेल असे बालेले जात आहे.

डॉ. रवींद्र मुळक असे संशयित डॉक्टरचे नाव आहे. मागील आठवड्यात सर्वत्र रेमेडिसीव्हर औषधाचा तुटवडा जानवत असताना पंचवटीतील जुना आडगाव नाका परिसरातील सदगुरू हॉस्पिटलचा संचालक असलेल्या डॉ. मुळक यांना 12 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पंचवटी पोलिसांनी अटक केली. अवघ्या बाराशे रुपयांचे रेमडिसव्हर इंजेक्शन तो 25 हजार रुपयांना विक्री करताना सापडला होता.

अशोका मार्ग भागातील योगेश मोहिते यांना नातेवाईकासाठी तीन इंगजेक्शनची आवश्यकता भासली. मित्राच्या मदतीने ते तपास करीत असताना डॉ. मुळक याच्याकडे औषधे असल्याचे समजले. त्यानुसार त्यांनी मुळककडे चौकशी केली असता त्याने प्रती इंगजेक्शन 25 हजार रुपयांना देणार असल्याचे सांगितले. मोहिते यांनी तत्काळ ही माहिती नियंत्रण कक्षास कळवली. नियंत्रण कक्षाने ही माहिती पंचवटी पोलिसांना दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या पथकाने सापळा रचून डॉक्टरला अटक केली.

मात्र, सदर डॉक्टरविरोधात आणखी कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. डॉ. मुळक यांनी औषधांची साठेबाजी केली आणि ते बाराशे ऐवजी थेट 25 हजार रुपयास विक्री केल्या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, संशयित आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. तसेच या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. या पार्श्वभुमीवर सहायक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव यांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या कुलसचिवांना डॉ. मुळकची सनद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.

सामान्यांमधून कारवाईचे स्वागत

गत महिन्यापासून शहरात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यात रेमडेसिव्हर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा काळाबाजार मांडण्यात आला. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागला. त्यामुळे पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे स्वागत करण्यात येते आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com