
देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devlali Camp
संसरी गाव ते देवळाली (Devlali) स्मशानभूमीकडे जाणार्या मार्गावरील पूल (bridge) धोकादायक ठरू पहात असल्याने कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासनाने (Cantonment Board Administration) त्याची वेळीच दुरुस्ती करण्याची मागणी संसरी गावचे उपसरपंच शेखर गोडसे यांनी केली आहे.
देवळाली कॅम्पच्या (Devlali Camp) नागरिकांसाठी स्टेशनवाडी लगतच्या टेंचिंग ग्राउंडजवळ सर्व सोयीयुक्त स्मशानभूमी (cemetery) दानशूर श्रॉफ परिवाराच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून स्टेशनवाडी लगतचा पूल रेल्वे विभागाने (Railway Department) मोठ्या वाहनांसाठी बंद केलेला आहे. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारी वाहने, तसेच कॅन्टोमेंटच्या घंटागाड्या, रेल्वे स्टेशनकडे संसरी मार्गाने जाणारे सर्व वाहने या पुलावरून जात असतात.
पूल अतिशय जुना व कमकुवत झालेला असल्याने मोठा अपघात (accidents) होऊ शकतो. याबाबत संसरीचे उपसरपंच शेखर गोडसे यांनी देखील कॅन्टोमेंट अधिकारी यांना माहिती दिली असता काल अधिकार्यांसह चंद्रकांत गोडसे, शेखर गोडसे यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सदर पुलाची दुरुस्ती तसेच रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.