देवळा येथे प्रहारचे थाळी-टाळी बजाव आंदोलन

देवळा येथे प्रहारचे थाळी-टाळी बजाव आंदोलन

देवळा | Deola

केंद्र सरकार बाहेर देशातून करत असलेल्या कडधान्यची आयात त्वरित थांबवावी तसेच रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकार बाहेर देशातून तूर, मुंग, उडीद सारख्या कडधान्याची आयात करत असून ती त्वरित थांबवावी तसेच रासायनिक खतांच्या दर वाढीबाबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू यांच्या आवाहनानुसार देवळा येथे थाळी व टाळी बजाव आंदोलन करण्यात आले. देवळा येथील पाचकंदील परिसरात सामाजिक अंतर राखत हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष कृष्णा जाधव, युवा तालुकाध्यक्ष बापू देवरे, शहराध्यक्ष हितेंद्र आहेर, संदीप पवार, संकेत जाधव, सोनू मोरे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com